सैय्यद ज़ाकिर
सहव्यवस्थापक/जिल्हाप्रतिनिधी वर्धा..
जाम मार्गावरील दाळमील येथून तुरदाळीचे २०० कट्टे चोरणाऱ्या ५ चोरांना समद्रपूर पोलिस स्टेशनच्या डि.बी.पथकाने जेरबंद केले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
समुद्रपुर पोलीस स्टेशनला अभय तांबोडी यांनी तुळदाळ कट्टे चोरी प्रकरणी ६ में २०२३ लाख तक्रार दाखल केली होती.तक्रारी नुसार अप.क्र.0324/2023, कलम ३७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुरुप्रसाद दालमील मध्ये ठेवलेले तुळदाळीचे कट्टे मागील 1 वर्षा पासून अज्ञात चोर चोरुन नेत असल्याचे तक्रारीत नमूद होते व कंपनीच्या कामगारांवर चोरी संबधाने संसय व्यक्त केला होता.
गुह्यांच्या पुढील तपास सुरू असून सदर गुह्याचे तपासात डी.बी.पथकाने सदर कंपनीत काम करीत असलेल्या,शिवनन्दी हरिप्रसाद कनोजिया रा.झिलमिली,जिल्हा छिंदवाड़ा (म,प्र), ह.मु.गुरुप्रसाद कंपनी कार्टर जाम,तह.समुद्रपुर यास संसयावरून ताब्यात घेऊन तूळदाळ चोरी संबधाने विचारपूस केली असता,त्याने सदरचा गुन्हा इतर साथीदार,नामे 2),शेर अली उर्फ सोनू नूर अली सैय्यद रा. हिगणघाट ,3), शुभाष काशीनाथ गायकवाड़ रा.कुंड शेगाव,ह. मु,हिगणघाट,4), रविन्द्र एकनाथ मोहूरले,रा.चीख़लगाव,चंद्रपुर ह.मु.हिगणघाट,5), प्रतीक वीरेंद्र दुर्गे,रा.हिगणघाट याचे सोबत संगमताने मिळून केल्याचे सांगितले.
यामुळे इतर अरोपिंना सुद्धा तात्काळ अटक करुन अरोपिंना न्यायालय समक्ष हज़र केले व पीसीआर अन्वये गुह्याचा पुढील तपास करण्यात आला.
पी.सी.आर वेळेत सर्व अरोपिंनी गुह्याची कबूली देत मागील 1 वर्षा पासून 10 वेळा प्रत्येकी अंदाजे 20 कट्टे चोरी केले असून,चोरी केलेला तुळदाळ माल हा वेगवेगळ्या दुकानदारांना व लोकांना विकला असल्याचे सांगितले.
आरोपी सोनू अली,सुभाष गायकवाड़,वरविंद्र मोहुरले यांनी स्वत शेतकरी असल्याची बतावनी करून त्यांची शेती आहे असे तुळदाळ विकताना सांगितले होते.
दाळीचे सैम्पल दाखवून,प्रती कट्टा (50)किलो हा 6 हजार दर प्रमाणे विकत देण्याचे ठरविले व काही महिण्याचे अवधीने घेण्याचे आश्वासन देऊन विक्री केले.
आरोपींसह त्यांचे कडुन त्यांनी खरेदी केलेले तुर दाळीचे कट्टे जप्त केले.
सदर प्रकरणाच्या तपासात आज पर्यन्त आरोपिंनी चोरुन नेलेले तुरी दाळीचे 50 किलो वजनाचे ऐकून 200 कट्टे ,प्रती कट्टा 6 हजार रुपये प्रमाणे 12 लाख रुपये,एक हिरव्या रंगाचा जार्न डिअर कंपनीच्या ट्रॅक्टर क्र.MH 32 /A H-9196 कीमंत 6 लाख रुपये व त्याला लागून असलेली एक हिरव्या रंगाची वीना क्रमांकाची ट्रॉली कीमंत ,1 लाख 50 हजार रुपये, एक टाटा मालवाहक गाड़ी क्र.MH _ 04,lFU _3282 कीमंत,4 लाख रुपये,असा एकूण 23 लाख 50 हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
हिगणघाटच्या काही व्यापारांनी चोरीची तुर दाळ मोठ्या प्रमाणात घेतली असल्याची चर्चा शहरातील नागरिकांत जोरात आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन समुद्रपुरचे पुलिस निरीक्षक प्रशांत काढे यांचे निर्देश प्रमाणे सा. फो.वीरेंद्र मस्के,पोहवा अरविंद येनुरकर,पो.ना.रवि पुरोहित,पो.शि.वैभव यांनी केली आहे.