डॉ.बाबासाहेब आबेंडकर जयंती निमित्य वराडा येथे दोन दिवसीय कार्यक्रम…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

कन्हान : – पासुन जवळच ७ किमी वर असलेल्या वराडा गाव येथे नव बौद्ध पंच कमेटी वराडा द्वारे डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांची १३३ वी जयंती दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

          शनिवार (दि.१३) एप्रिल २०२४ ला सायंकाळी डॉ बाबासाहेब आबेंडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करुन जन्मोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येईल. तदंतर बुद्ध धम्म संघ प्रचार मैत्री संघ यांचा प्रबोधन कार्यक्रम करण्यात येईल.

            रविवार (दि.१४ ) एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांचा जयंती निमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेस पुष्प माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात येईल.

         त्यानंतर भव्य आरोग्य रोगनिदान शिबीरात अरिहंत मल्टीस्पेश लिटी हॉस्पिटल येथील डॉ. रजत जैन यांच्या चमुंच्या सहकार्याने नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्या त येईल.

         महाप्रसाद वितरणाने दोन दिवसीय जन्मोत्स व कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. या दोन दिवसीय कार्यक्रमास गावातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नव बौद्ध पंच कमेटी वराडा यांनी केले आहे.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, नव बौद्ध पंच कमेटी वराडाचे उमेश मेश्राम, अक्षय मेश्राम, हर्षल नेवारे, राहुल खोब्रागडे, लिलाधर पाटील, संजय मेश्राम, अक्षय सोमकुवर, रोशन जामदार, शिवदास डोंगरे, शुभम मेश्राम, मिथुन सोमकुवर, अरविंद मेश्राम, सावन पाटील, खुशाल पाटील, नरेंद्र गजभिये, प्रविण पाटील सह गावकरी नागरिक सहकार्य करित आहे.