अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही:-
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मेंढा माल येतील गावालगत एका शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीत पडलेल्या पूर्ण विकसित घोणस सापाला स्वाब संस्थेचे सर्पमित्र यश कायरकर यांनी दोराच्या साह्याने 50 फूट खोल विहिरीत उतरून जीवदान दिले.
गावालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये घोणस हा विषारी साप असल्याचे शेतकरी बोरवेलचे पाणी सुरू करायला गेले असता निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी रोषन धोतरे यांना दिली. त्यांनी कळविताच ‘स्वाब’ संस्थेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र यश कायरकर यांनी 20 किलोमीटरचा प्रवास करीत मेंढा(माल) येथील इंग्रज कालीन कोरड्या विहिरीमध्ये धोका पत्करून, दोरखंडाच्या साह्याने उतरून , सापाला सुरक्षित पकडून, त्याला शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील जंगलात सुरक्षित स्थळी सोडून जीवदान दिले.
विशेष म्हणजे तळोधी ,नागभीड, शिंदेवाही या परिसरामध्ये वन्यजीव व पर्यावरण यांचे संवर्धन व संरक्षणासाठी झटनारी ‘स्वाब’ या संस्थेचे सर्पमित्र जिवेश सोयाम, महेश बोरकर, विकास लोणबले,यश कायरकर हे परिसरातील कुठूनही आलेल्या फोन काल वर उपस्थित होऊन परिसरातील सापांना पकडून त्यांची वन विभागात नोंद करून सुरक्षित ठिकाणी सोडून देतात.
या कार्यामध्ये त्यांनी आजपर्यंत हजारो विषारी, बिनविषारी सापांना जीवदान दिले असून यावर्षी सुद्धा वन विभागात नोंद करीत शेकडो सापांना, तथा कासव, घोरपड, उदमांजर, सारख्या व गावात घुसलेले इतर वन्यजीव व सरपटणाऱ्या प्राण्यांना सुद्धा पकडून गावाबाहेर सोडून जीवदान दिलेले आहे.
या घोणस सापाला सुरक्षित सोडते वेळी डब्लू. पी. एस. आय. चे सदस्य रोशन धोत्रे , गिरीधर निकुरे, सुरज गेडाम हे उपस्थित होते.