डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली,(जिमाका)दि.12: सामाजिक न्याय विभागाने दिनांक 01.04.2023 ते 01.05.2023 या कालावधीमध्ये “सामाजिक न्याय पर्व” अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचे निशचित केले आहे. त्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रप्क्रिये संदर्भात माहिती गडचिरोली जिल्हयातील सर्व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) आयोजन करणेबाबत आयुक्त, समाज कल्याण, म.रा.पुणे, व मा.महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी निर्देश दिलेले आहे.गडचिरोली जिल्ह्रयातील उमेदवारांना सदरचे ऑनलाईन वेबीनार (Webinar) बाबत जनजागृती व्हावी, जेणे करुन सर्वसामान्य लोकांपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची माहिती (उदा. अर्ज कोणत्या प्रकारे करावे, कोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे इ.) मिळावी व अर्जदारास अर्ज सादर करताना ऑनलाईन सुविधेचा अचुकपणे/प्रभावीपणे वापर करणे शक्य होईल.त्यानुषंगाने समितीस्तरावर ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) आयोजन दिनांक 13/04/2023 रोजी दुपारी 01.00 वाजता करण्यात आलेले आहे, याबाबत अधिकाधिक कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय प्राचार्य, अर्जदार, पालक व विद्यार्थी यांना सदरच्या जिल्हास्तरीय वेबीनारचे (Webinar) सहभगी होण्याचे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी केले आहे. वेबीनारची (Webinar) लींक पुढील प्रमाणे आहे. (Google Meet) :- Thursday, Apr13 · 01:00 -02:00PM Video call link (ID):- https://meet.google.com/phz-acuf-dgd