शेतकरी बांधवानी कृषी विषयक शासकीय योजनेचा लाभ घ्यावा :- सरपंच गजानन गुळधे. — सातारा येथे शेतकऱ्यांसाठी पार पडली कार्यशाळा.

शुभम गजभिये 

   विशेष प्रतिनिधी 

       शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक योजना,कृषी तंत्रज्ञान,शेतकऱ्यांपर्यत पोहचवीणे व प्रचार प्रसिद्धी करणे संदर्भात कार्यशाळा मौजा सातारा येथे नुकतीच संपन्न झाली.

     असून याप्रसंगी सरपंच गजानन गुळधे,कृषी विज्ञावेता डॉ.श्रीमती सोनाली लोखंडे,कृषी भूषण हेमंतजी शेंद्रे,कृषी अधिकारी सरोज सहारे,विस्तार अधिकारी कांबळे,कृषी सहाय्यक येवले,ग्रामसेवक जे.आर.गुप्ता सातारा येथील कार्यशाळेला उपस्थित होते.

           तद्वतच सर्व मार्गदर्शकांनी शासकीय योजना व कृषी तंत्रज्ञान याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.या कार्यशाळेत बऱ्याच शेतकऱ्यांनी उपस्थित दर्शविली होती.