
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- बहुजन हितकारिणी सामाजिक संस्था पंचशील बुद्ध विहार साकोली येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
सुरूवातीला माता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.प्रमिला टेम्भुरकर, प्रमुख पाहुणे सौ.छबिला नंदेश्वर, उत्तमा गडपायले, लेसना राऊत, निलिनी रंगारी,सुरेखा उंदिरवाडे , कला खांडेकर, कुंता शहारे, गीता राऊत, माया गणवीर ,नाजूका कांबळे,शकुंतला घोडेस्वार, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
सौ.प्रमिला टेम्भुरकर सौ.उत्तमा गडपायले, काजल खंडाळे,ज्योती मेश्राम यांनी महिला दिनाच्या विषयावर महिला कशी सक्षम राहील व आपली जिम्मेदारी काय या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.स्मिता राऊत आभार मनीषा खोब्रागडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूजा मडामे, शालू कोटांगले, वर्षा मेश्राम, वर्षा खंडाळे, हेमा जनबंधु, मंदा लोणारे, विद्या शहारे, डॉ.,रुचिका श्यामकुवर, कीर्ती रंगारी वर्षा घरडे, श्रद्धा श्यामकुवर, व बरेच महिला मंडळी यांनी सहकार्य केले.