हुकुमशाहीची चोर पाऊले….

      जगातील आणि देशातील हुकुमशाही आणि लोकशाहीची लढाई ही आजची नाही तर ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.या लढाईत कधी लोकशाही जिंकते तर कधी हारते.

      हुकुमशाही आणि लोकशाहीची लढाई 15 ऑगस्ट 1947 पूर्वी 90 वर्ष चालली.म्हणजे 1857 चे शिपायाचे बंड पासून 1947 पर्यंत च राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा.या लढाईत अखेर साम्राज्यशाही हरली आणि लोकशाहीचा विजय झाला.म्हणजे एक प्रकारची क्रांतीच झाली.तरी हुकुमशाही थकली नाही की भागली नाही.तिचा सत्तेत येण्याचा प्रयत्न आपल्या देशात असो की जगात असो चालूच आहे.काहीही झाले तरी हुकुमशाही पेक्षा लोकशाहीची ताकद अधिकच असते.

           म्हणून विजय हा तिचा ठरलेलाच असतो.परंतु ती उदार व प्रेमळ असते.शत्रुलाही मित्र मानते.शत्रू पण अखेर माणूसच आहे,जनावर नाही.त्यास बुध्दी आहे,आज ना उद्या त्याला आपल्या चुकीची जाणिव होईल,आणि तो सुधारेल,म्हणजे हुकुमशाही प्रवृत्ती सोडून लोकशाही स्वीकारेल अशा भ्रमात लोकशाही असते,म्हणूनच ती फसते.खरे तर विकृत प्रवृत्तीच्या बुध्दीला ” जशास तसे, ठोशास ठोसा,tit for tat ” असेच धोरण ठेवले पाहिजे.पण लोकशाहीचे असे धोरण नसते,म्हणूनच लोकशाही हाराते आणि हुकुमशाही जिंकते.असा जगाचा राजकीय लोकशाहीचा इतिहास आहे,त्याकडे जरा अवलोकन करून पाहिले म्हणजे समजेल.

    1947 ले भारत हुकुमशाही चे जोखडातून म्हणजे गुलामगिरीतून मुक्त झाला.1952 पासून प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही सुरू झाली.परंतु तरीही हुकुमशाही प्रवृत्तीची माणसे व्यक्ती संघटना जिवंतच होत्या.लोकशाही म्हणजे ” स्वातंत्र्य,विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य,संघटना स्वातंत्र्य ” अशी व्याख्या संविधानाने केली.म्हणून हुकुमशाही प्रवृत्तीच्या ,जनविरोधी शक्तींनी आपले विचार सांगणे थांबविले नाहीत.संघटना बंद केल्या नाहीत,कार्य बंद केले नाहीत.कारण लोकशाही म्हणजे मुक्तांगण,मैदान यावर कुणालाही काहीही कसेही खेळता येते,हे त्यांना माहीत होते.

            याचा फायदा त्यांनी उठविला आणि चोर पावलांनी म्हणजे आमने सामने आणि रस्त्यावरची लढाई न करता,रक्त न सांडता,अहिंसेच्या मार्गाने षडयंत्र करून परत या देशात हुकुमशाही आली.या छुप्या लढाईत या देशातील जनतेच्या धार्मिक श्रद्धा च गैर फायदा घेतला.लोकशाही मार्गानेच पण ई व्ही एम मध्ये घोटाळा करून, जाती धर्म मजबूत करून ,लोकांना फुकटच्या योजना देऊन,त्यांना पंगू लाचार भिकारी बनवून,निवडणुकीच्या याद्यात गडबडी करून,धर्मनिरपेक्ष पक्षात घुसून,सत्ताधारी पक्षा त प्रवेश करून म्हणजे अशा अनेक गैर मार्गाचा वापर करून प्रतिगामी शक्ती ,म्हणजे हुकुमशाही शक्ती जोर धरल्या,आणि आज हुकुमशाही सत्तेत आहे.हे मतदारांच्या लक्षात पण आलेले नाही.

     खरे तर लोकशाहीने च लोकशाहीचा गळा दाबून लोकशाहीचा जीव कसा घ्यायचा ? तिला कसे संपवायचे ? त्यासाठी संघर्ष ,लढाई,रक्तपात न करता कोणकोणती षडयंत्र करायची यात आजचे सत्ताधारी हुकूमशहा निष्णात आहेत.

          ज्यांना भारताचा स्वातंत्र्याचा राष्ट्रीय लढा मान्य नव्हता,ज्यांना लोकशाही मान्य नाही,ज्यांना हा तिरंगा झेंडा मान्य नाही,त्यांना भगवा किंवा हिरवा झेंडा महत्त्वाचा वाटतो,तोच राष्ट्र ध्वज ,आणि धर्माचे राज्य असावे ,असे ज्यांना वाटते,असे हिंदुत्ववादी किंवा मुस्लिमवादी आणि तेही हुकुमशाही वादी लोकच म्हणजे आर.एस.एस.आणि मुस्लीमलीग या दोन संघटना लोकशाही विरोधी लढाई करीत आहेत.ही लढाई आजची नाही,तर फार जुनी आहे.

           खरे तर हिंदू मुस्लिम हा वाद मिटावा म्हणून गांधीजींनी “हिंदुं मुस्लिम ऐक्य” हे धोरण अवलंबिले होते.आपल्या संविधानाने राष्ट्राची अखंडता आणि सामाजिक एकता यासाठी काँग्रस ने धर्मनिरपेक्षता हे धोरण स्वीकारले.यातूनच विविधतेत एकता ” ची संस्कृती म्हणजे या देशाची जुनी परंपरा आहे,ती स्वीकारली.आणि तिचाच समावेश संविधानात केला.

         सर्व धर्म , सर्व जाती,सर्व आराधना,परंपरा,इतरांच्या विचारांचा व समृद्ध परंपरेचा आदर,सर्व धर्मांचा आदर या गोष्टी संविधानात नमूद करून देशातील साऱ्या नागरिकांना एका धाग्यात गुंफण्यात आले,जसे की अनेक रंगाच्या फुलांची एक सुदंर माळ बनवावी,तसे संविधान तयार झाले.अशा या सर्व समावेशक (विचार आचार ) असे संविधान च नष्ट करून फक्त एकच धर्म , एकाच रंगाचा ध्वज,एकच पक्ष,एकच देश ( म्हणजे राज्य सरकार नकोत ) पक्षाचा प्रमुख हाच हुकूमशहा अशा प्रकारचे धोरण असणारी विचाराची काही व्यक्तींची महत्त्वाकांक्षा आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.

      सत्तेतील भाजपा पक्षाचे धोरण हे सर्वसमावेशक नाही.सर्व धर्म सर्व संस्कृतीच आदर करणारे नाही.लोकशाही मानणारे नाही.हिटलर मुसोलिनी हे साम्राज्यवादी हुकूमशहा ,हे त्यांचे आदर्श आहेत.मनुस्मृती त्यांना मान्य आहे.संविधान मान्य नाही.हे त्यांचेच पक्षाचे ,संघटनांचे लोक उघड उघड बोलून दाखवीत आहेत.

       ई व्हीं एम ,धर्म ,श्रध्दा , मतदार याद्या मध्ये गडबड, आमदार खासदार यांना प्रलोभने दाखविणे, ई डी ची भीती दाखविणे,पक्ष फोडणे,राज्य सरकारे पाडणे,सरकारी उद्योग सेवांचे खाजगीकरण करणे,देशाची जमीन भांडवलदारांना देणे,महागाई ,बेकारी,भ्रष्टाचार यात उत्तरोत्तर वाढच करणे ,दोन धर्मात ,दोन जातीत भांडणे लावणे , टि. व्हि.वर्तमान पत्रे या प्रचार माध्यमांना विकत घेणे,दत्तक घेणे,पत्रकार परिषदा न घेणे,विरोधी पक्ष ई वी एम मशीन द्वारे संपविणे असे अनेक चोर पावलांचा वापर करून सत्तेत असलेली हुकुमशाही लोकशाहीचाच वापर करून सत्तेत कायम राहण्याचा प्रयत्न करीत आहे.

        विचारवंत साहित्यिक यांचेवर एक प्रकारचा दबाव आहे.सर्वांच्या लेखण्या थांबल्या आहेत.लढाऊ कार्यकर्ते ढिले पडले आहेत.हे हुकुमशाही चे सावट असल्यामुळेच.गुलामगिरीला सुरुवात झाली आहे.म्हणून आता परत एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई करण्याची वेळ आली आहे. भीतीच्या वातावरणात सडून मरण्यापेक्षा लढून मरण्यातच पुरुषार्थ आहे.जीवनाचे सार्थक आहे.हे भारतीय नागरिकांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

             दिनांक: 12 मार्च 2025.

               फोन : 9420912209.