निलय झोडे
नागपूर विभागीय प्रतिनीधी
दखल न्यूज भारत
नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “बाल आनंद मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले.या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक यांनी आनंद घेतला.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी शिक्षकांनी व पालकांनी घेतला. नवनवीन पदार्थाची ओळख व ते कशाप्रकारे तयार केले जाते याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण – तणाव दूर करून विरंगुळा मिळावा व विद्यार्थ्यांच्या अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते तसेच कमवा व शिका याची जाणीव होण्यासह विविध व्यवसायाची माहिती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता एस. व्ही.कामथे, एम.एम.कापगते, आर.एम. मिरासे, सौ. सोनाली क-हाडे, सौ.वेणू लिमजे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.