कूरखेडा येथे सर्जिकल निदान व आरोग्य शिबीराचे आयोजन.. — १४७ रूग्नांची तपासणी..

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

          सर्जरी केअर फांऊडेशन नागपूर व वन जन हक्क फाऊंडेशन यांचा संयुक्त विद्यमाने शहरातील जि.प.शाळेचा पटागंणात ७ जानेवारी रविवार रोजी दूपारी १२ ते ५ वाजेदरम्यान मोफत सर्जिकल निदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबीरात १४७ रूग्णांची तपासणी करीत सर्जरी ची गरज असलेल्या रूग्नाना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. 

             शिबीरात क्लबफूट (जन्मजात आजार) चे मोठ्या प्रमाणात रूग्नांची तपासणी करीत आजाराचे निदान करण्यात आले.क्लबफूटच्या रूग्णांची शस्त्रक्रिया नागपूर येथे फाउंडेशनच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे.

            यावेळी कार्यक्रमाचा प्रस्तावना करताना सर्जरी केअर फांऊडेशनचे संस्थापक संचालक विनय जावळे‌ व वन जन हक्क फाऊंडेशनचे संचालक डॉ.केशव वाळके‌ यानी संस्थेचे उद्देश्य व गरीब गरजू रूग्नाकरीता राबविण्यात येणारी औषधोपचार सेवा,तसेच मोफत करण्यात येणारे शस्त्रक्रिया शिबीरे याची माहिती दिली.

          डॉ.आशिष कोरेटी यानी आदिवासी दूर्गम भागातील नागरिकांचा सोई सूविधा अभावी आजाराचे निदानच होत नसल्याने उपचार होत नाही व त्याना शारीरिक मानसिक कष्ट सहन करावे लागते या वंचित घटकाना आरोग्य सेवेचा लाभ मीळावा याकरीता दूर्गम भागात फाउंडेशनचे माध्यमाने रूग्ण सेवा करण्यात येत आहे.आवश्यक रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

        शिबीरात डॉ.केशव वाळके‌,डॉ. आशिष कोरेटी,डॉ.प्रशिल उईके, तालूक्यातील आशा वर्कर यानी सेवा बजावली तर यशस्वीतेकरीता सर्जरी केअर फांऊडेशनचे विनय जावळे‌,सागर देशमुख,नईम दिवान यानी सहकार्य केले.