जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे यासाठी रामटेक विधानसभा शिवसेना प्रमुख विशाल बरबटे यांच्या हस्ते कन्हान येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

          पारशिवनी:-जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे यासाठी रामटेक विधानसभा श्रेत्राचे शिवसेना प्रमुख विशाल बरबटे यांच्या हस्ते कन्हान येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात सपन्न झाले. 

         या प्रसंगी उदघाटक विशाल बरबटे यांनी उडघाटन प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांनी म्हटले की जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून शिवसेना(उ.बा.ठा.)पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सर्वानी करा. जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे असे प्रतिपादन विशाल बरबटे यांनी केले.ते जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यात बोलत होते. 

           या उदघाटन समारंभा प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक श्री.सुरेश साखरे,रामटेक लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री.उत्तम कापसे,उपजिल्हा प्रमुख श्री.राधेश्याम हटवार,विधानसभा सल्लागार प्रमुख श्री.अरुण बनसोड होते यावेळी यांनी सर्व पाहुणानी आपले विचार व्यक्त केले.   

          पुढे बोलताना विशाल बरबटे म्हणाले कि,या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले जाणार आहे.सरकारच्या विविध योजना या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवल्या जाणार असून याचा लाभ जनतेला दिला जाणार आहे.त्यामुळे हे कार्यालय विकासाचे केंद्र बिंदू ठरेल,असे काम या कार्यालयाच्या माध्यमातून करा आणि शिवसेना(उ.बा.ठा.) पक्ष मजबूत करा असे आवाहन त्यांनी केले.

           कार्यक्रमाची प्रस्तावना पारशिवनी तालुका प्रमुख श्री.कैलास खंडार यांनी तर संचालन व अभार रामटेक तालुका प्रमुख श्री.हेमराज चोखांद्रे यांनी केले.

             कार्यालय उदघाटन प्रसंगी विधानसभेतील शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी,महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.