घुग्घूस येथील कराटेपटुंनी राज्यस्पर्धेत गोल्ड मेडल पटकावून शहराचे नावलौकिक वाढविले….

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर : शहरात नुकतेच राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर कराटे स्पर्धेत शोतोकान कराटे प्रशिक्षक मोनिष हिकरे यांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाळूनी आपल्या चमकदार कामगिरीनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.

        स्पर्धेत सहभागी कु. त्रिशा जितेंद्र मेश्राम हिने सुवर्ण पदक (गोल्ड मेटल ) व कास्य पदक जिंकले, आयुष्यमान श्रवण वर्मा यांनी एक सुवर्ण पदक (गोल्ड मेडल ) व कास्य पदक जिंकले कु. अभिरी विवेक शेंडे व हितांश स्वप्नील इंगोले यांनी सुवर्ण पदक जिंकले. 

         खेळाळूनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई – वडिलांना तसेच शोतोकान कराटे असोसिएशनचे प्रमुख शिहान विनय बोढे यांना दिले.

          काँग्रेस नेते सैय्यद अनवर तसेच काँग्रेस जिल्हा सचिव अजय उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धेत टीम मॅनेजर म्हणून कु.सना सैय्यद यांनी काम पाहिले विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.