राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीरचे आयोजन…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

हिंगणघाट – स्थानिक रा. सु.बिड़कर कला, वाणिज्य महाविद्यालय हिगणघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे 25 जानेवारी ते 31जानेवरी 2025/ मध्ये नांदगांव बोरगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

        उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर,उद्घाटक उपविभागीय पुलिस अधिकारी रोशन पंडित, नेक समन्वय डॉ.शरद विहीरकर, डॉ.अनिल बाभले,मुख्याध्यापक अनिल कारा मोरे यांची उपस्तिथि होती.

       या श्रमसंस्कार शिबिरात पर्यावरण व प्रदूषण या वर डॉ.किशोर व डॉ.जयंत शेंडे यांचे मार्गदर्शन झाले.सायबर सुरशा या वर पुलिस सब इंस्पेक्टर श्रीमती सुनीता ठाकरे, जिल्हा बालविकास अध्यक्षा रश्मिर घाताते यांचे मार्गदर्शन झाले.

         जादू-टोना कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन या वर पंकज बांगरे,निलेश गुड़घाने,यांचे मार्गदर्शन झाले. विषमुक्त नासार्गिक शेत्ती या वर मनोज गायधने, पशुधन या वर पशुसवर्धन अधिकारी डॉ.ज्योति चौहान,रक्तदाता विश्यी डॉ.रवि भांगे,यानी मार्गदर्शन केले.या सोबतच मुलगी वाचवा मुलगी शिकवा प्रा.विकास बेले,पालीथिन मुक्त व स्वच्छ भारत यावरही मार्गदर्शन झाले.

        सोब्बत आरोग्य,पशु जनहितकरण,रक्तदान करण्यात आले.या सात दिवसीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.राजू निखाड़े,संचालक डॉ.गजानन बक,आभार प्रा.विकास बेले यांनी मानले.