आरो प्लांट ATM द्वारे पाणी चालू करण्याचे शिवतेज मंडाळाची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मंदीर परिसरात नागरिकांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. पण गेल्या महीन्यात याठिकाणी चपल स्टॅन्डची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांना व भाविकांनी शुध्द पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहवे लागत असून आळंदी देवस्थानच्या वतीने योग्य ते शुल्क घेऊन पाणी पुरवठा चालू करावा अशी मागणी शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने आळंदी देवस्थानकडे करण्यात आली आहे.

       शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे व मंडाळाचे उत्सव प्रमुख मंगेश तिताडे यांनी याबाबत सदर निवेदन आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

      शिवतेज मित्र मंडळाजवळ तसेच माऊली बाग परीसरात योग्य ते शुल्क आकारुन आरो प्लांटमार्फत शुध्द पाणी एटीएम मशीन द्वारे चालू करावे तसेच सदर एटीम मशीनचा खर्च शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येईल असे मंडाळाचे अध्यक्ष आनंदराव मुंगसे यांनी सांगितले.