
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्मृती दिवस निमित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि आळंदी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम इंद्रायणी तिरावर रक्षा विसर्जन स्तंभ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आळंदी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार वडगांवकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, आळंदी नगरपरिषदेचे विष्णुकुमार शिवशरण, प्रसाद बोराटे, नाना घुंडरे, लक्ष्मण मेदनकर, दिगंबर कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, डॉ.सुनील वाघमारे, माऊली घुंडरे उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि.१२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७७ वर्ष ही परंपरा सुरु आहे.