श्रीहरी बालाजी महाराज घोडायात्रा निमित्त भव्य…. — घोडा यात्रा महोत्सवाची मेजवानी १३ फेब्रुवारीला,चिमूरात गिता रबारी येणार…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

चिमूर :- श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा निमित्त भव्य घोडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले असून दिनांक १३ फेब्रुवारी पासून महोत्सवास सुरवात होत आहे.

       लाईव्ह कॉन्सर्ट आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध गायिका गिता रबारी चिमूर नगरीत १३ फेब्रुवारीला येत आहे.चिमूर तालुक्यातील रसिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

      चिमूर घोडा यात्रा महोत्सव २०२५ चे चिमूर ते वरोरा रोड फॉरेस्ट ऑफिसच्या बाजूला दिनांक १३ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता लाईव्ह कॉन्सर्ट गिता रबारीच्या गायन कार्यक्रमचे उदघाटन आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या हस्ते होणार आहे.

        दिनांक १५ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता लाईव्ह कॉन्सर्ट हंसराज रघुवंशी यांचा कार्यक्रम आयोजित आहे.दिनांक १६ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता लाईव्ह कॉन्सर्ट वैभव गुघे व सोम्या कांबळे (नॅशनल लेवल डान्स चॅम्पियनशिप) डान्स तर दिनांक १७ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता डॉ कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.

         चिमूर तालुक्यातील रसिकानी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चिमूर घोडा यात्रा उत्सव समिती च्या वतीने करण्यात आलेले आहे.