गोविंदा-गोविंदाच्या गजरात निघाली घोडारथ यात्रा…  श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रेकरिता भक्तांची अलोट गर्दी… लाखो भक्तांनी घेतले श्रीहरी महाराजांचे दर्शन… शहरभ्रमण करीत काढली भव्य घोडारथयात्रा…

     रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- २९६ व्या घोडायात्रा उत्सवा निमित्त १० फेब्रुवारी मिती माघ शुद्ध वसंत पंचमीला श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्र प्रारंभ झाली. मिती माघ शुद्ध पंचमी सोमवारला मध्यरात्री अश्वारूढ लाकडी घोड्यावर श्रीहरी बालाजी महाराज यांची विष्णूची मूर्ती बसवून घोडा रथाचे चिमूर शहरातून नगर भ्रमण करण्यात आले. या घोडारथ यात्रेसाठी भक्तांनी अलोट गर्दी करीत श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. 

          घोडा रथ यात्रा परंपरा नुसार रात्री महाआरती पूजा अर्चना करून १२.३० वाजता श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ फटाक्याची आतिशबाजी,भजन दिंडी, ढाळ मृदूंग, डिजे संगीताच्या तालावर शहरातील मुख्य मार्गवरील शहीद बालाजी रायपूरकर चौक, नेहरू चौक, अहींसा चौक, मार्केट लाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नगर भ्रमण करून सकाळी मुख्य मार्गाने पहाटे ६ वाजता श्रहिरी बालाजी मंदीरा समोर विराजमान करण्यात आले.

       यावेळी श्रीहरी बालाजी समोर ठेवण्यात आले. दरम्यान लाखो बालाजी भक्तांनी श्रीहरी चे दर्शन घेतले. या रथ यात्रेत मध्यप्रदेश आंध्रप्रदेश छत्तीसगड व राज्यातील बालाजी भक्तांनी घोडा रथ यात्रेत हजेरी लावली होती. यावेळी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान कमेटीचे विश्वस्त निलम राचलवार, डॉ मंगेश भलमे, ऍड चंद्रकांत भोपे डॉ. दिपक यावले, नैनेश पटेल,धमरमसिंग वर्मा आदी उपस्थित होते. दरम्यान आमदार कीर्तीकुम ऊर्फ बंटी भांगडीया यांनी श्रीहरी चे दर्शन घेतले. ही घोडा रथ यात्रा महाशिवरात्री पर्यंत राहते. यात्रेत विवीध संघटनांनी शहरातील मुख्य मार्गावर मसाला भाताचे स्टॉल लावून श्रीहरी बालाजी भक्तांना वाटप करण्यात आले.

        यात्रेत आकाश पाळणे, टॉवर झुला, ड्रगन, बोट, भूत बंगला मौत चा कुआँ, मिना बाजार, खेळण्यांची दुकाने, मनोरंजनात्मक कार्यक्रम व विवीध साहित्याची दुकाने सजली आहेत. हि घोडा रथ यात्रा महाशिवरात्री पर्यंत चालणार आहे. यात्रेदरम्यान पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत भक्तांसाठी यंत्रणा सज्ज ठेवली.