दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत, त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे. सकल मराठा समाजाकडून येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी (ता.१४) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज, आळंदी शहराच्यावतीनेही शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आळंदी पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, अशोक रंधवे पाटील, सागर भोसले, सचिन गिलबिले, दिनेश घुले, संतोष भोसले, अरुण कुरे, उमेश कुऱ्हाडे, अर्जून मेदनकर, रोहन कुऱ्हाडे, श्रीकांत काकडे, शशी राजे जाधव, निसार सय्यद, राजू महाराज दिवाणे आदी मान्यवर उपस्थित होते.