ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली : पोटच्या मुलाला समोर मृतावस्थेत पाहून जसा मानवप्राणी आईचा हंबरडा फोडतो व केविलवाणा करतो हेच कदाचित मानवाने पाहिले आहे.
पण ज्या मुक प्राण्यांना हंबरडा फोडता येत नाही.पण जन्म दिलेल्या श्वानाचे पिल्लू असो की यात त्या मुक श्वान आईची कृतज्ञतेची माया असो,यात मायेची व त्यांच्या पिल्लूची सहहृदय माया असते हे विसरून चालणार नाही.
साकोलीत आज असाच प्रसंग अनुभवास आला.येणारेजाणारे अपघातात मृत्यू झालेल्या श्वानाकडे बघत होते व तोंड वाकडे करून जात होते.पण येथील प्राणीप्रेमी किशोर बावणे यांच्या हृदयाचा यावेळी पाझर फुटला आणि त्यांनी हे प्रासंगिक दृष्य साकोली मिडीयाकडे प्रसारणार्थ कथन केले.
शहरात राष्ट्रीय महामार्गावर जूने तहसिल समोर सकाळी एक श्वान पिल्लू अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले होते.आपल्या पोटच्या पिल्लूला मृतावस्थेत पाहून आईने तिथेच बस्तान मांडले.
वारंवार येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर भुंकत जणू आपला राग ती आई व्यक्त करीत होती.सतत सकाळपासून ते दूपारीपर्यंत त्या आईने आपल्या पिल्लूच्या शवाजवळ ठाण मांडून बसली होती.
कारण मुक्या प्राण्यांनाही ईश्वर वेदनादायक माया देत असते हे या केविलवाण्या दृष्यातून दिसुन आले.तातडीने ही बाब शहरातील जागृत प्राणी प्रेमी व अव्वलस्थानी असणारी फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्या नजरेस पडली.
त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाचारण करून अखेर त्या चिमुकल्या पिल्लूचे अंत्यसंस्कार करण्यात आले.फ्रिडमचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी ही बाब साकोली मिडीयाला सांगण्याचा उद्देश हा की,अखेर मानवाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही दुःखाची भावना आणि आपले पोटाचे कुणी गेल्याचे दुःख असते.
आजच्या या लबाडखोरी युगात मानवाला काय जाण? “की, ते मुके प्राणीही काही आपल्याला सांगू शकत नाही.परंतु मानवाला त्यांच्या भावना ओळखता आली पाहिजे.