कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :-तालुक्यातिल दहेगाव जोशी करंभाड जिं प सदस्या अर्चना भोयर याचे जि प सर्कल हदीतील गरडा गाव ते गवना गाव पर्यत दीढ किलोमिटर अंतराचा मंजुर पाधन रस्ता चे बाधकाम चा भुमी पुजन आज रविवारी दुपारी जिं प सदस्या सौ. अर्चना भोयर याचे हस्ते भुमी पुजन करण्यात आला.
जि.प.नागपूर च्या बांधकाम विभाग १७ सामूहिक निधी अंतर्गत गवणा ते गरंडा दरम्यान शेतकऱ्यांचे सोयीचे दृष्टीने पांधन रस्ता कामास निधी उपलब्ध करून दिली.
या भुमीपुजन सोहळा शुभ प्रसंगी उपस्थित मा.पुरुषोत्तमजी धोटे माजी सरपंच, रमेश महालगावे, पारधी साहेब, जूनघरेजी, चुडामनजी ठाकरे,दीपक भोयर,सुयोग भोयर व गवना व गरंडा ग्राम पंचायत चे सदस्य व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.