दखल न्युज भारत चिखलदरा
चिखलदरा तालुका प्रतीनीधी-:अबोदनगो चव्हाण
(चिखलदरा) येथे धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक कार्यही करण्यात येत असून, यामध्ये जबलपूर निवासी पूज्य श्री सुरेशजी महाराज यांच्या शिवपुराण ज्ञानयज्ञासह भव्य रोगनिदान शिबिर, नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे देखील दिले जात आहेत तसेच दंत उपचार, रक्तदान यांसारखे अनेक आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सलग अकरा वर्षे अमरावती येथील रहिवासी राजूभाऊ नंदनवार परिवाराकडून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे.
श्री भवानी शिवमंदिराची स्थापना 2012 मध्ये झाली असून तेथे नंदनवार कुटुंबीयांची अखंड सेवा सुरू आहे, हे जाणून घ्या!
डॉ.राम ठाकरे, डॉ.प्रवीण मोर्ले, डॉ.आयुष सांगोळे, डॉ.गौरव ठाकरे, डॉ.अमित भाकर, सद्भावना मंचचे आदर्श गजभिये, श्री तख्तमल श्रीवल्लभ चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती, डॉ.अब्रार, डॉ.बरमा परतवाडा हे सेवारत आहेत.
या कार्यक्रमात,
सर्वांनी वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक नंदनवार परिवाराने केले आहे!