दखल न्यूज भारत,
विजय शेडमाके
दिं. १२ फेब्रुवारी २०२३
सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील स्व.गोपाळा रुषीजी भोयर हे इसम कॅन्सर ग्रस्तांनी बरेच दिवसापासून आजारी होते.त्यांचे दोन दिवसा पुर्वी मृत्यू झाल्याची माहिती भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते पत्रुजी गेडाम यांनी भाजपा तालुकाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल तसेच खासदार अशोकजी नेते यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम यांना दिली.
या माहितीची खासदार अशोक नेते यांनी तात्काळ दखल घेत कॅन्सर ग्रस्तांने मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना आज दिं १२ फेब्रुवारी २०२३ ला गडचिरोली येथील निवासी कार्यालयामध्ये खासदार अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल,ता.महामंत्री तथा नगरसेवक सतीशभाऊ बोम्मावार,भाजपा युवा नेते निखिलजी सुरमवार,ग्रा.प.सदस्य दिवाकर गेडाम, संदिप घोटेकर कवठी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.