युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या अमरावती जिल्हा परिषद अधिकारी कर्मच्यारी क्रीडा महोत्सव २०२३ मधे पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरचे खेळाडूनी जिल्हास्तरावरील उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करत अनेक खेळामध्ये विजयी आणि उपविजयी संघ राहिले त्यामधे कबड्डी महिला विजय, खो-खो महिला विजयी, सांस्कृतिक कार्यक्रम विजयी, फुटबॉल उपविजयी यासह क्यारम , टेबल टेनिस, स्विंगमिंग, लांब उडी, धावणे, भालफेक, थाळीफेक, बॅडमिंटन, आणि इतर वैयक्तिक अनेक खेळामधे विजयी व उपविजय नोंदवून जनरल चॅम्पियन उपविजयी पर्यंत मजल मारली. त्याप्रित्यर्थ प. स.नांदगाव येथील खेळाडूचा गुणगौरव समारंभ डॉ.पंजाबराव देशमुख सभागृह नांदगाव खंडे येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमामध्ये प स.नांदगाव चे गटविकास अधिकारी, प्रकाश नाटकर साहेब, अल्ताफ नवाझ शेख गटशिक्षणाधिकारी, आदरणीय कल्पणाताई वानखेडे माजी गटशिक्षण अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व विस्तार अधिकारी ह.ना.गोहत्रे अधीक्षक शा.पोषण आहार, विलास राठोड, प्रविण मेहरे, राजू खिराडे सर्व केंद्रप्रमुख आणि सर्व खेळाडू सहभागी झाले होते.
कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम विजयी संघाचे कर्णधार यांचे कडून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गुणगौरव समारंभ मधे कर्मचाऱ्यांनी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आहे.
जिल्हा क्रीडा महोत्सवात विजय व उपविजय चमुंनी जिल्हास्तरावरील प्राप्त टॉफी, शिल्ड सन्मानपूर्वक खेळाडू संघा तर्फे गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना सुपूर्त करण्यात आले.
त्यानंतर संगीता सोळंके, इंदिरा पोटेकर आणि तृप्ती सिंगंनवाडे या खेळाडूंनी क्रीडा महोत्सव व गुणगौरव सोहळ्यानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी आपली बलस्थाने व त्रुट्या याविषयी मते व्यक्त करण्यात आली. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा प.स. नांदगाव ला कर्मचारी क्रीडा महोत्सवात अनेकदा शिल्ड व टॉफ्या मिळाल्या परंतु अश्या प्रकारे कुणीही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही असे मनोगत खेळाडूंनी व्यक्त केले.
यथोचित मान्यवरांनी खेळ व क्रीडा संबंधी मार्गदर्शन केले. त्यानंतर क्रीडा महोत्सवात सहभागी सर्व विभागप्रमुख पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांचे हस्ते टॉफी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सर्व खेळाडूंना गौरविण्यात आले. अधिकारी कर्मच्यारी क्रिडा महोत्सवात समन्वयक म्हणून उत्कृष्ट भूमिका पार पडल्याबद्दल श्री.सुरज मंडे सरांन्ना गटविकास अधिकारी मा.श्री.प्रकाश नाटकर साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी सामूहिक स्नेह भोजनाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप देशमुख विस्तार अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन संदीप डोफे यांनी पार पाडले. विशेष परिश्रम घेतल्याबद्दल श्रीकांत मेश्राम, रत्नाकर मूळे आणि मनीष पंचगाम, प्रशांत भगेवार, नितेश अंभोरे, आणि कार्यक्रम आयोजन समिती व सर्व खेळाडू यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.