
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जंयती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रशांतो मुखर्जी, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकिय अधिकारी विनोद किरपान व सतिश गोटेफोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आली.
युवा दिना प्रसंगी वर्ग ९वी ची युक्ती गहाने हीने विद्यार्थ्यांना सांगितले की, उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहचत नाही तो पर्यंत थांबू नका, मी दुर्बल आहे, असे कधीही समजू नका. आत्मश्रदधा ही सर्वाहून अधिक बलशाली प्रेरक शक्ती आहे. बल हेच जीवन व दुर्बलता हा मृत्यूचा मार्ग तसेच स्वामी विवेकानंद देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत म्हणून संबोधित केले.
तसेच वर्ग ९ वी चा कर्तव्य गुप्ता याने राजमाता जिजाऊ विषयी संबोधित करून आईची महती सानेगुरूजींच्या स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या पंक्तीचा सम्यक वापर करून पटवून दिले. छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराकम अशा सत्वगुण देणाऱ्या राजमाता यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले. संचालन कर्तव्य गुप्ता याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले.