
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघाच्या अंतर्गत उपवर उपवधू व पालक परिचय मेळावा आयोजन समिती तर्फे १ व २ फेब्रुवारीला ३७ व्या राज्यस्तरीय उपवर उपवधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शकुंतला फार्मस् नागपूर रोड चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर मेळावा संपन्न होणार…
*****
उद्घाटन सोहळा….
शनिवार — १ फेब्रुवारीला
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशराव वांढरे उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक न्यु इंडियन महाल नागपूर,कार्यक्रमाचे उद् घाटक, नितीन भटारकर सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर, प्रमुख पाहुणे, प्रा.डॉ. प्रशांत माणुसमारे विभागप्रमुख मैनेजमेंट सायन्स अँड रिसर्च,जे एम पटेल महाविद्यालय भंडारा, डॉ. महेश बोरीकर एम.बी.बी.एस.एम.एस.(जन सर्जरी) एम.सीएच.(युरोलाँजी,) डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड (युरोलाँजी) प्रा.डॉ.उषा गहुकार (राखुंडे) सहा.प्राध्यापिका,शिवरामजी मोघे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केळापूर ( पांढरकवडा ) जि.यवतमाळ, डॉ. सुधाकर साखरकर, माजी प्राचार्य पी.बी. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँन्ड हॉस्पिटल,चंद्रपूर — विशेष आमंत्रित मान्यवर — दगडु कुंभार निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रपूर, विजय बोरीकर शहर अभियंता तथा कार्यकारी अभियंता (स्थापत्य), महानगरपालिका चंद्रपूर,
*****
सत्कार सोहळा….
विशेष उपस्थिती — प्रतिभा धानोरकर लोकसभा सदस्य, चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघ, सुधारकरराव अडबाले विधान
सदस्य,शिक्षक मतदारसंघ नागपूर विभाग (म.रा.) हंसराज अहिर अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग भारत सरकार…
*****
१ फेब्रुवारीला…
ध्वजारोहण,सकाळी. ९.०० वाजता,प्रा.डॉ.ज्योती राखुंडे अध्यक्ष महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघ यांच्या शुभहस्ते
श्री.प्रभु विश्वकर्मा सकाळी ९.१५ वाजता प्रतिमेचे पुजन — सतिश माणुसमारे कार्याध्यक्ष महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघ संतोष बोरीकर महासचिव महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघ,प्रमोद माणुसमारे अध्यक्ष ३७ वा उपवर उपवधू व पालक परिचय मेळावा आयोजन समिती तथा माजी महासचिव महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघ यांच्या हस्ते…
****
उद्घाटन सोहळा सकाळी ११. ०० वाजता…
स्मरणिका विमोचन दुपारी १२.१५ वाजता…
प्रथम परिचय सत्र दुपारी १२.३० वाजेपासून
चर्चासत्र सायं. ५.३० ते ६.३० वाजता पर्यंत…
सास्कृतिक कार्यक्रम सायं ७.०० ते ९.३०,स्नेहभोज दुपारी १२.३० ते सायं.७ वाजेपर्यंत…
*****
२ फेब्रुवारीला…
चहा व नाश्ता सकाळी ७.३० ते ९.०० पर्यंत…
व्दितीय परिचय सत्र सकाळी ०९ वाजेपासून विवाह सोहळा (जुळून आल्यास)…
सकाळी १०.१५ वाजता स्नेहभोज सकाळी ११.३० ते ६.०० वाजेपर्यंत..
सत्कार सोहळा दुपारी २.३० वाजता…
महासंघातर्फे महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार वितरण
महाराष्ट्र सुतार कलारत्न पुरस्कार
वितरण व रोख भेट…
भाग्यवान विजेते उपवर उपवधूस
रोख भेट….
सामुहिक विवाह जोडपे विजेते भेटवस्तु….
सामुहिक विवाह सोहळ्यात सर्व सहभागी जोडप्यांना विशेष भेट..
गरजु व होतकरु समाज भगिनींना शिलाई मशिन वाटप..
गुणवंत विद्यार्थी सत्कार व पारितोषिक वितरण सोहळा…
*****
समारोपीय कार्यक्रम दुपारी ५.३० वाजता…
रमेशराव वांढरे..
उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक न्यु इंडियन एलिवेटर्स महाल नागपूर यांचे अध्यक्षतेखाली समाप्त होणार आहे.