चिमूर तालुकातंर्गत मौजा सावरी (बिडकर) मुख्य मार्गाला केव्हा जोडला जाणार?:- आयु.बुध्दरत्न शेंडे… — खानगाव ते खांबाडा रस्ता बांधकाम रखडले…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

         चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत मौजा खानगाव चिमूर तालुक्यात येतो आहे तर मौजा खांबाळा वरोरा तालुक्यात येतो आहे.मौजा खानगाव ते खांबाडा हा (एमडीआर) रोड जोडला गेल्यास मौजा सावरी (बिडकर) हे गाव मुख्य मार्गाला जोडले जाणार आहे.

         यामुळे मौजा खानगाव ते खांबाडा या 500 मीटर रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण केव्हा होणार असा सवाल मौजा सावरी (बिडकर) येथील समाज सेवक बुध्दरत्न शेंडे यांनी संबंधित प्रशासनाला केला आहे.

        चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) हे गाव बरेच वर्षापासून दुर्लक्षित असून सावरी (बिडकर) हे गाव अजून पर्यंत मुख्य रस्त्याल्या जुडलेले नाही.

      पर्यायाने हे गाव विकासाच्या कोसो दुर आहे. मौजा सावरी (बिडकर) येथे प्राथमिक स्वास्थ केंद्र,कर्मवीर विद्यालय हायस्कूल,स्टेट बँक, सून स्वातंत्राच्या 78 वर्षानंतर साधी बस सुविधा नाही ही मोठी लाजीरवाणी बाब असल्याचे मत श्री.बुध्दरत्न शेंडे यांचे आहे.

       त्याच प्रमाणे गावा लगत आमडी (बेगडे) ,खापरी’, भिवकुंड ही गावे असून मौजा सावरीला ये-जा करणे करीता सोयीस्कर रस्ते नाहीत.

        सदर रस्त्यावर नदी असल्याने नदीवर पुल नाही. पर्यायाने या गावातील नागरिकांचे मौजा सावरीला येणे-जाणे पावसाळ्यात बंद असते.

          चंद्रपूरचे सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता यांनी खानगाव ते खांबाडा रस्ता बांधकाम करण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे असे श्री.बुध्दरत्न शेंडे यांच्यासह परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.