
युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.2 अंतर्गत 2024-25 चा द्वितीय पुरस्कार 2 लाख रुपये दर्यापूर पंचायत समिती मधिल जिल्हा परिषद पूर्व माध्य.मराठी शाळा, कान्होली यांना जाहीर झाला.
खासदार बळवंत वानखडे , दर्यापूरचे आमदार गजानन लवटे, माजी जि. प. सदस्य सुनिल डिके यांच्या हस्ते तसेच पंचायत समिती दर्यापूरचे गटविकास अधिकारी कालिदास तापी, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार जाधव, राजेंद्र कटारमल, गटसमन्वयक सुनील स्वर्गीय यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद कुरळकर, कान्होली शाळेतील सहायक शिक्षक किशोर बुरघाटे व कु. सारिका मोहिते आदींचा सन्मान चिन्ह देऊन दर्यापूर तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण क्रीडा आधी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना देणे, शासनाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्दीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट आहेत.
शाळेला मिळालेल्या बक्षिसाचा उपयोग शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने अभियानाच्या वरील उद्दिष्टासोबतच शालेय गुणवत्ता व भौतिक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.