आज आमच्या देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या मूळनिवासी असलेल्या आदिवासी समाजाचे आणि विशेष म्हणजे महिलांचे प्रातिनिधिक नेतृत्व…
आणि आमच्या,”मेरा भारत महान…देशाचे प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती म्हणून त्याचबरोबर लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याची घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी ही केवळ आणि केवळ ही आपलीच होती आणि आहे व राहील……
कारण……
देशाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दर पाच वर्षांनी जेंव्हा जेंव्हा होत असतात,तेंव्हा तेंव्हा त्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलावून त्या सभागृहांसमोर पहिले अभिभाषण करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला प्रदान केलेला आहे.
या अभिभाषणातून केंद्र सरकारचे,देशाचा राज्यकारभार चालवीन्याचे तसेच नागरिकांचे मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे आणि सर्वांगीण विकासाचे आश्वासन देण्याचे हे अभिभाषण असते.
खरे पाहता,आपली निवड ही कोणत्याही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यातून न होता,ती…. आदरणीय माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम सारखी विविध क्षेत्रातून व्हायला हवी होती!
परंतू,तरी सुद्धा हरकत नाही. जेंव्हा कोणत्याही राजकीय पक्षातून जरी त्या पदावर जर राष्ट्रपती म्हणून बसलात. त्याचक्षणी आपण त्या पक्षाचे नसून देशाचे राष्ट्रपती आहात, हे हृदयातून एक संविधाननिष्ठ आणि लोकशाहीनिष्ठ, संविधान रक्षक आणि लोकशाहीचे रक्षक म्हणूनच स्वतः स्वतःच्या आरशात पाहुन मान्य केले पाहिजे…
असे आमच्या देशाचे नाक असणाऱ्या,जगात भारताची ओळख संविधानिकरित्या तुमच्याच नावाने होत असणाऱ्या महान लोकशाही देशाचे आपण आधारस्तंभ आहात…
परंतू,जेंव्हा याच देशातील मणिपूर गेल्या 600 दिवसापासून अक्षरंशा जळत आहे.आमच्याच देशाच्या दोन आदिवासी समाजात तेढ निर्माण करुन एका राजकीय कुटील डावाला यशस्वी करण्यासाठी, उद्योगपतींच्या आर्थिक लाभासाठी,दंगल घडविल्या जाते.त्याची सुरुवातच कारगिलमध्ये शहीद झालेल्या दोन जवानांच्या सहचारिनींची नग्न धिंड काढून त्यांच्यासोबत दीडशेच्या वर जमाव काय करत होता.हे संपूर्ण देशाने बघितले.
परंतू,ते आपल्याला कसे आणि का दिसू शकले नाही?आपल्या डोळ्यावर किंवा हृदयावर कुणी पट्टी बांधली होती का?आपण कोणत्या समाजाचं प्रातिनिधिक नेतृत्व करत होता?
का म्हणून आपण स्वतः मणिपूर मध्ये गेला नाहीत किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलं नाही?
उलट त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला तिथे दखल घ्यावी लागली!आणि जेंव्हा बदलापूर प्रकरण घडले तेंव्हा मात्र तुम्ही…..“आता बस झालं म्हणून सांगता,याचा अर्थ काय?
” जेंव्हा सेंट्रल व्हिस्टा म्हणजेच नवीन संसदेची निर्मिती झाली,तेंव्हा धर्मनिरपेक्ष असलेल्या संविधान,लोकशाही देश असलेल्या संसदेचे उदघाटन एका विशिष्ट धर्माच्या धर्मप्रसारकांच्या हस्ते होते आणि तुम्हाला साधे निमंत्रण सुद्धा नसते…..
हे तुम्हाला संविधानाचे उल्लंघन वाटत नाही? हा तुम्हाला लोकशाहीचा व तुमचा अपमान वाटत नाही का?
या व अशा अनेक कारणामुळे,विशेष म्हणजे आमच्या देशात अल्पसंख्यांकाचे आम्ही संरक्षण ( मणिपूर प्रकरणामुळे ) करू शकत नाही.हा संदेश जो जगात पोहोचला आहे.त्याचे तुम्हाला काहीच कसे का म्हणून वाटत नाही?
आज जी युरोपियन देशांच्या प्रमुखांमध्ये जी जागतिक स्तरावर आमच्या प्रधानमंत्री मोदीच्या राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय धोरणामुळे लोकशाहीच्या नावावर हिंदू राष्ट्र बनविण्याच्या धोरणामुळे स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये धोक्यात आलेली आहेत.त्याचे भविष्य कोणते असेल याचा आपण कधी विचार करणार की नाही?
असेच हे वारे RSS / भाजपाने वाहवत नेले…..
आणि आमचा देश आणि लोकशाही जर धोक्यात आली. त्याला केवळ आणि केवळ तुम्ही आणि तुम्हीच या देशाचे प्रथम नागरिक म्हणून त्याला जबाबदार असणार आहात…
*****
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…