
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- पो.स्टे. पारशिवनी दिनांक ०९/११/२०२० चे २२/२४ वा. दरम्यान फिर्यादी सरतर्फे पो.ना.मनीराम नेवारे पो.स्टे.पारशिवनी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. पारशिवनी येथे अप. क्र. २८५/२० कलम ३०४,२०१ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
दिनांक १२/१०/२०२० चे ०९/०० या प्रकरणातील दरम्यान यातील आरोपी नामे बापुराव गणपत मिसार वय ६९ वर्ष रा. कोढासावळी ( पारशिवनी)याने आपले शेतात कोंबड्याचा कुटाराचे संरक्षणाकरीता जाळीचे कंपाउंड लावुन त्या कंपाऊंड जवळ लाकडी खुट्या गाडुन त्या खुटयाला लोखंडी बारीक तार बांधुन त्या तारेला इलेक्ट्रीक करंट लावुन ठेवले असता घटना तारीख ०९/११/२०२० या वेळी घडली होती.
यातील मृतक नामे प्रदीप रामराव बावने वय २८ वर्ष रा. कोंढासावळी हा आरोपीच्या शेताकडे गेला असता मृतकास इलेक्ट्रीक तारेचा करंट लागल्याने जागीच मरण पावला.
सदर प्रकरणाचे तपास पो.उप नि.विनायक नागुलवार यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता न्यायमुर्ती श्री. आर.आर.भोसले,जिल्हा व सत्र न्यायालय १० नागपूर कोर्टामध्ये सादर केले.
आज रोजी न्यायमुर्ती श्री.आर.आर.भोसले,जिल्हा व सत्र न्यायालय १० नागपूर यांनी वरील नमुद आरोपी बापुराव गणपत मिसार वय ६९ वर्ष रा. कोढासावळी ( पारशिवनी) यास कलम ३०४ (भाग २) मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास तसेच १ लाख २०, हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ०१ वर्ष सश्रम कारावास तसेच कलम २०१ भादवि मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ष साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी शेंदरे सो.यांनी काम पाहीले.कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन मपो हवा.स्मिता मोहनकर पो.स्टे. पारशिवनी यांनी मदत केली आहे.