आळंदीत संघटना बळकटीसाठी जोमाने कामाला लागा :-भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील… — आळंदी शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : शहरामध्ये मोठया संख्येने नागरिक भाजपाचे समर्थन करीत आहेत. नागरिकांची कामे कुठे अडणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. भुतकाळातील गोष्टी विसरून नव्या विचारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांचा सन्मान राखून संघटना बळकटीसाठी जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे, असा सल्ला भाजपचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना दिला. भारतीय जनता पार्टीचे आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली शहर कार्यकारिणी आळंदी येथील साई मंगल कार्यालयात पार पडली.

         यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बुट्टे पाटील बोलत होते. शहरातील कार्यकत्यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संघटनेत काम करताना सर्वांनी एकमेकांशी संवाद साधा.असेही ते म्हणाले. यावेळी संजय घुंडरे पाटील, संदीप सातव, पांडुरंग वहीले, सचिन गिलबिले, भागवत आवटे, रूपेश वाळके, संतोष गावडे, ॲड.आकाश जोशी तसेच विविध सेलचे अध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

          आळंदी शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष यांचा यामध्ये समावेश आहे. भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या शहराध्यक्ष पदावर फेरनियुक्ती झाल्यानंतर किरण येळवंडे शहर कार्यकारिणी कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

***

भारतीय जनता पार्टी आळंदी शहर कार्यकारिणी

शहराध्यक्ष – किरणशेठ येळवंडे

कार्याध्यक्ष – बंडूनाना काळे

संघटन सरचिटणीस – ज्ञानेश्वर बनसोडे

सरचिटणीस – सदाशिव साखरे

कोषाध्यक्ष – सुरेशनाना झोंबडे,

उपाध्यक्ष

प्रमोद बाफना,

संकेत वाघमारे,

ॲड.सचिन काळे,

विकास पाचुंदे,

मोर्चा व आघाडी अध्यक्ष

युवा मोर्चा अध्यक्ष – वासुदेव तुर्की,

महिला मोर्चा अध्यक्ष – संगीताताई फपाळ,

ओबीसी आघाडी अध्यक्ष – भागवत काटकर,

व्यापारी आघाडी अध्यक्ष – आनंद वडगावकर,

उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष – योगेश प्रताप सिंह,

विद्यार्थी आघाडी अध्यक्ष‌ – प्रथमेश होले,

कामगार आघाडी अध्यक्ष – शिवानंद पाटील,

सोशल मीडिया अध्यक्ष – विशाल भागवत,

युवा मोर्चा उपाध्यक्ष

स्वप्निल कुऱ्हाडे,

राजेश वहिले,

सुजित काशीद,

कृष्णा पालवे,

बाळासाहेब पालवे

ओबीसी आघाडी उपाध्यक्ष

किसन पालवे,

ज्ञानेश्वर थोरवे,