प्रदीप रामटेके 

    मुख्य संपादक 

         देशातील शेतकऱ्यांनी एक किलो सुध्दा,आपल्या शेतात शेतमाल पिकवू नये अशा प्रकारची महाभयंकर घातक तथा गंभीर निती भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारची आहे.त्यांची निती व रणनिती ही या देशातील शेतकऱ्यांना व नागरिकांना स्वस्त रुपयांचे परावलंबी मजूर बनवणारी असल्याने,त्यांच्या घातक व गंभीर नितीला कायम लगाम लावणे आवश्यक आहे.यामुळे आपण गाफील व झोपून न राहता केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या निती विरोधात जबरदस्त आंदोलन केले पाहिजे आणि त्या साठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे,असे आवाहन त्यांनी नागपूरच्या वैचारिक परिवर्तन भूमीतून गंभीरपणे देशातील शेतकऱ्यांना व नागरिकांना केले आहे.

         नागपूरच्या डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात,”समतेसाठी भव्य शेतकरी रॅलीचे,आयोजन ११ जानेवारी रोज बुधवारला करण्यात आले होते.या रॅलीचे ते मुख्य मार्गदर्शक होते.

      राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकेट यांनी,”समतेसाठी भव्य शेतकरी रॅली,मोर्चात सहभागी होत अनेक गंभीर विषयावर भाष्य करताना म्हणाले,”ज्या देशात कमजोर राजकीय पक्ष देशातील नागरिकांची सुरक्षा करण्यास व त्यांचे हित जपण्यास अयशस्वी ठरतात तेव्हा देशातील लोकशाही ही हुकुमशाहांची बटलीक बनते अर्थात लोकशाहीच्या ठिकाणी हुकुमशा कार्यपद्धत सुरु होते आणि तिथेच तानाशाहीचा जन्म होतो.

 

       “तानाशाही म्हणजे मनमानी कारभार,मनमानी कारभार हा देशातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो ५ ते १० भांडवलदारांच्या हिताचा आहे.म्हणूनच भाजपाच्या तानाशाही केंद्र सरकारने भांडवलदारांचे हित जपणारे व शेतकऱ्यांच्या विरोधातले आणि शेतकऱ्यांचे कायमचे अहीत करणारे,”तिन कृषी बिल, कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत मंजूर केले होते.

          यामुळेच या,”तिन कृषी बिलांच्या विरोधात,देशातील करोडो नागरिकांच्या एकजूटीद्वारे आंदोलनातंर्गत १३ महिने प्रदिर्घ संघर्ष करावा लागला,तेव्हाच ते तीन कृषी बिल कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत भाजपच्या केंद्र सरकारला रद्द करावी लागली.

          रशिया देशाचा हवाला देत त्यांनी सांगितले की तिथे मोजक्या भांडवलदारांच्या घशात संपूर्ण शेतजमीन देण्यात आली व शेतकऱ्यांना भुमिहीन करण्यात आले.याला रशिया राज्य सत्तेचे कारण एकच होते ते म्हणजे स्वस्त मजूरीत भांडवलदारांना मजूर मिळावेत.भाजपाचे केंद्र सरकार रशिया प्रमाणेच भारतातील मोजक्या भांडवलदारांसाठी भारत देशातील शेतकऱ्यांना शेतिविहीन परावलंबी करु इच्छिते आहे आणि शेतकऱ्यांना तथा मजूरांना स्वस्त दरातील मजूर करु इच्छिते आहे.

          आतातर,”देश विकासाच्या गोंडस नावाखाली,भांडवलदारांच्या घशात देशाची सर्व मालमत्ता खाजगीकरणातंर्गत देण्याचा सपाटा केंद्र सरकारने सुरु केला आहे,हे तर भाजपाच्या केंद्र सरकारचे देशातील सर्व नागरिकांसाठी दुरगामी गंभीर परिणामांचे घातक छडयंत्र आहे.

      यामुळे भाजपाचे तानाशाही केंद्र सरकार हे या देशातील नागरिकांच्या हिताचे नसून,असे केंद्र सरकार तुमची सुरक्षा व रक्षा करुच शकत नाही.या सरकारच्या विरोधात सातत्याने प्रभावी व परिणामकारक जन आंदोलन करुन देशातील नागरिकांत वैचारिक जागरुकता करावी लागणार आहे,वैचारिक जागरुकता संघर्षमय आंदोलन करण्याचे गमक असल्याने नागरिकांच्या जागरुकतेकडे गंभीर लक्ष देणे आवश्यक असल्याचे सुतोवाच त्यांनी सोडले.तद्वतच वैचारिक क्रांतीच परिवर्तन घडवून आणते,हे त्यांनी स्पष्ट केले.

         देशातील नागरिकांच्या हितासाठी व सुरक्षासाठी आपण शहीद व्हायला तयार असायला पाहिजे व या संबंधाने आपण इतर नागरिकांत जागरूकता करून त्यांच्यात त्यांच्या हितासाठी व सुरक्षासाठी नवी उमेद निर्माण केली पाहिजे.

          “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,ही संघटना गंभीर घातक असून नकली हिंदू,नकली मुस्लमान,नकली शिख तयार करतोय व त्यांच्या अंतर्गत आपसात भांडणे लावतोय‌.याचबरोबर देशातील नागरिकांच्या अहितासाठी छडयंत्र करतोय,या संघटनेचे काॅडरबेस स्वयंसेवक गोड बोलून इत्यंभूत माहिती संकलित करतात व तुमच्या विरोधात काम आणि कार्य करतात,म्हणून तुम्ही या संघटने पासून दूर झाले पाहिजे व दूर राहिले पाहिजे.

        “ते पुजा पाठ करणे वाले असले तरी ते बली देणे वाले आहेत,हे आवर्जून प्रथमतः लक्षात घेतले पाहिजे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले व शेवटी घाबरु नका असे सांगत,त्यांनी खाजगीकरणाच्या विरोधातील व इतर जनविरोधी कार्यपद्धतीच्या विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभागी व्हा!असे आवाहन त्यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com