नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल सीबीएसई साकोली येथे युवा दिन व राजमाता जिजाऊ जंयतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, विनोद किरपान व सतिश गोटेफोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सांगितले की, उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहचत नाही तो पर्यंत थांबू नका, मी दुर्बल आहे, असे कधीही समजू नका. आत्मश्रदधा ही सर्वाहून अधिक बलशाली प्रेरक शक्ती आहे. बल हेच जीवन व दुर्बलता हा मृत्यूचा मार्ग, जनसेवा हिच ईश्वर सेवा असते तसेच स्वामी विवेकानंद देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत म्हणून संबोधित केले. राजमाता जिजाऊ विषयी संबोधित करून आईची महती सानेगुरूजींच्या स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या पंक्तीचा सम्यक वापर करून पटवून दिले. छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा सत्वगुण देणाऱ्या राजमाता यांना वेदिका राठोड व वेदांती चांदेवार यांनी गीत गायनातून त्रिवार अभिवादन केले. संचालन माधुरी हलमारे व आभार प्रतिमा डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com