सुमारे पाऊणेचार हजार वर्षांपूर्वीच्या आर्याच्या अतिक्रमणाची पुनरावृत्ती संविधान आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अर्थात 2025 मध्ये.
सर्व बहुजनहो आणि संविधाननिष्ठ, देशभक्तहो, विज्ञानवादी, विवेकवादी म्हणजेच मानवतावादी आणि विशेष म्हणजे आपापल्या कट्टर आंधळ्या धर्मापेक्षा निसर्गाला आणि मानवता धर्माला मानणाऱ्या मूलनिवासी आणि पूर्वीच्या शूद्र, अती शुद्रानो, काळाच्या ओघात वाहत जाणाऱ्यानो, जय संविधान…
सुमारे पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी संपूर्ण विश्वात आपल्या भारतात आणि ग्रीक देशात 100% लोकशाही मूल्ये स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता 100% अविष्कारीत झालेली होती. जी निसर्ग नियमावर आधारित होती. त्या काळात म्हणजे आर्यांचे कुसांस्कृतिक आपल्या देशावर आक्रमण होण्यापूर्वी आपल्या देशात…
अज, यक्षु, शिग्रू, पणी, नाग आणि द्रविड…
या वंशाचे लोक या देशात राहत असत. हजारो वर्षांपासून वरील वंशाचे लोक येथे मूलनिवासी होते. शिवाय यांच्यात लोकशाही मूल्ये 100% अविष्कारीत झाल्यामुळे खरा मानवताधर्म भारतात आणि ग्रीकमध्ये प्रस्थापित झाला होता.
अशा लोकशाही आणि तीची मूल्ये प्रस्थापित आणि अविष्कारीत झालेल्या ग्रीक आणि आपल्या देशातील त्या काळात…..
जगाच्या पाठीवर कुठेतरी जन्म घेतलेल्या या निसर्गविरोधी, मानवतावादाविरोधी, लोकशाही मूल्यांवीरोधी, विज्ञानवादाविरोधी, विवेकवादाविरोधी, असलेल्या……
साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनितीला आर्यानी जन्म घातला…
आणि या कुटनीतीच्या संपत्तीला सोबत घेऊन आपल्या स्त्रियांनाही सोबत न घेता आपल्या मूळ देशातून निघुन इतर देशावर आपल्या कुटनीतीच्या बळावर कुठे कुसांस्कृतिक राज्य करता येईल का, ही तपासणी करत – करत, एक -एक देश पादाक्रांत करत -करत, जेंव्हा ते आपल्या देशात आणि ग्रीकमध्ये आले, तेंव्हा त्यांना इथे कुटनीती प्रस्थापित करण्यासाठी खूप सोपे होईल असा आत्मविश्वास वाटला. आणि ते इथे आपले हातपाय पसरण्यास त्यांनी सुरुवात केली. जसजसा जम बसू लागला तसातसा त्यांच्या इतरही अनेक टोळ्या या दोन्ही देशात येण्यास सुरुवात झाली. आर्यांचे हे कुसांस्कृतिक आक्रमण ( आगमन ) वर्षानुवर्षे चालत राहिले.
जणूकाही एखाद्या मुंगीला साखरेचा खडा मिळावा, आणि त्या खड्यासाठी तीने मुंग्याची रांगच जमा करावी…..
अशा काळात आपल्या देशातील मूलनिवासी असलेल्या (वर सांगितलेले मूळ वंशाचे लोक) लोकांमध्ये आर्याना आपली कुटनीती प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आणि त्यात ते हळूहळू यशस्वी होऊ लागले. या मूळ वंशाच्या आपल्या देशातील लोकांमध्ये पहिल्यांदा तुमचे, अग्निदेव, इंद्रदेव या देवांच्या दैवीकल्पना या आर्यानी येथील लोकांत घुसविल्या. आणि यांच्यावर साम, दाम, दंड आणि भेदाच्या कुटनीतीचा पगडा प्रभावी करण्यास सुरुवात केली.
हळूहळू लोकशाही मूल्ये लोप पाऊन कुटनीतीला येथील जनता बळी पडू लागली. जे बळी पडत नव्हते त्यांच्यावर बळाचा वापर करुन संपवण्यात आर्य यशस्वी झाले. जेंव्हा संपूर्ण जनता त्यांच्या कुटनीतीला बळी पडली. तेंव्हा यांच्यावर कुसांस्कृतिक आणि राज्य कुणी करावं हा प्रश्न निर्माण झाला, तेंव्हा त्या आर्या – आर्यातच एकमेकात यादवी युद्ध झाले. याला इतिहासात……
“दाशराज युद्ध”
असे म्हणतात. या युद्धात भरत नावाची आर्याची टोळी बलदंड ठरली. ( जिसकी लाठी उसकी भैन्स ही म्हण प्रचलित झाली). म्हणून या बलदंड भरत नावाच्या टोळीवरून या देशाला भारत नाव पडले…..!
आणि इथून पुढे आर्याच्या कुटनीतीच्या सडलेल्या मेंदूतून जे जे लोकशाहीविरोधी मूल्यांना, निसर्ग नियमांना पायदळी तुडविण्यासाठी कूविचार बाहेर पडतील तीच खरी मानवी मूल्ये आहेत. असा गैरसमज येथील शरणागती स्वीकारलेल्या उरलेल्या तत्कालीन मूळ वंशाच्या लोकांचा झाला…..
आणि इथेच आपल्या देशात या बाहेरून आलेल्या आर्यांचे कुसांस्कृतिक व राजकीय आक्रमण यशस्वी झाले……..
टीप :- या लेखाचा उर्वरित भाग उद्याच्या भागात किंवा कदाचित आणखी दोन भाग सुद्धा होऊ शकतील ….
या लेखाचे 1/2किंवा जास्तीत जास्त 3 भाग येतील ते सर्व भाग आपल्या मोबाईलमधील वयक्तिक मो. नं. आणि व्हाट्सप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करावे….
लेखक आणि आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
(संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689)