बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
श्री गुरुदत्त जयंतीचे अवचित्य साधून पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर गावच्या वतीने सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताहच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज कान्होबा महाराज देहुकर पंढरपूर यांची सेवा झाली.
अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी श्रीगुरु कान्होबा महाराज देहुकर कीर्तन सेवे प्रसंगी बोलत आसताना म्हणाले की गरीब असो अथवा श्रीमंत आसो सगळ्यान करीता एकच भगवंताच नाम चिंतन हेच साधन आहे.
चित्त एकरूप ठेवून परमेश्वराचे नाम चिंतन केल्यानंतर स्वतः भगवंतच प्रसन्न होतो. म्हणूनच नाम चिंतनाचा विसर पडू देऊ नका श्रीगुरु कान्होबा महाराज देहुकर यांचे अखंड हरिनाम सत्ताह प्रसंगी उद्घार…तीन ते चार हजार भाविक भक्त या कीर्तन सेवा प्रसंगी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवसाची अन्नदान सेवा पिंपरी बुद्रुक येथील सर्व समस्त सुतार परिवार बांधव यांच्या वतीने करण्यात आली.
अखंड हरिनामाचे नाम चिंतन घेण्यासाठी तीन ते चार हजार भाविक भक्त यांची दररोज उपस्थिती असते.
यावेळी पिंपरी बुद्रुक, मळवली गणेशवाडी ,सराटी, बावडा, टणु, टाकळी, चांदज, संगम, बाभळगाव, गार अकोले, शेवरे, नरसिंहपूर,गोंदी, तांबवे, आलेगाव, ढेकळवाडी ,इंदापूर, कोंडबावी शिंदेवस्ती, जगदाळे वस्ती, वाघोली ,पंदारवाडी ,महाळुंग, बिजवडी, गिरझणी ,भांडगाव ,खंडाळी ,अकलूज, शेटफळ ,श्रीपुर ,लवंग ,माळीनगर, तांदळवाडी ,आडेगाव ,वडापुरी ,कांदलगाव, आदी गावातील भझनी मंडळ भाविक भक्त टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
रोज हरी किर्तन सेवा,भजन रात्रभर हरिजागर हे सर्व कार्यक्रम चालु आहेत, प्रत्येक दिवसाला रोज नित्यनेमाने व्यवस्था व सर्व सुविधा पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त, व ग्रामस्थांच्या वतीने दररोज लागणारा चहा, अल्पोहार , महाभोजन, फुल हारांची व्यवस्था, रांगोळी, रोज लागणारे श्रीफळ, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप स्टेज व डेकोरेशनही आणि स्वयंपाक साठी आचारी सेवा ही नियमाप्रमाणे सर्व काही व्यवस्था केलेली आहे.
अखंड हरिनाम सप्ताह पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने चौथ्या वर्षीही शेवा घेण्यात आलेली आहे.
तरी या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ भाविक भक्त टाळकरी, विणेकरी,मृदुंग वादक,महिला भगिनी,तरुण वर्ग व श्रोते मंडळी मोठ्या संख्येने आपली उपस्थित लावीत आहेत.
सप्ताहाचे संपूर्ण सुत्रसंचलन ह भ प महेश सुतार महाराज दररोज करीत आहेत.