दामोधर रामटेके/संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १२ डिसेंबरला भव्य मोर्चा नागपूरात होत आहे.
या मोर्चाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार व शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांना मोर्चाला संबोधित करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.
तद्वतच महाराष्ट्र राज्यातील पक्ष प्रमुख,इतर सर्व पदाधिकारी व आमदार,संबोधणार आहेत..
या मोर्चाला अख्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते येणार असल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मोर्चा अंतर्गत शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न,बेरोजगारांना रोजगार देण्याचा मुद्दा,महाराष्ट्र राज्यातंर्गत नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर घटनाक्रम,सामाजिक सलोखा,आणि इतर महत्वाच्या घडामोडींचा उजाळा असेल.
कारण महाराष्ट्राच्या या सरकारला शेतकऱ्यांसी, बेरोजगारींसी व विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुचित जातींच्या विद्यार्थ्यांप्रती अजिबात आस्था नाही असेच त्यांच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येते आहे.
सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्राची शिष्यवृत्ती अनुसूचित जातींच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अजूनही देण्यात आली नाही.यावरुन हे सरकार किती दडपशाहीचे आहे हे अलगद लक्षात येते आहे.
मोर्चाला यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून लाखोंच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे संकेत आहेत.