दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
येत्या २५ डिसेंबरला वंचितचे सर्वेसर्वा एड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे सभा निमित्ताने नागपूरला येणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीची पुर्व विदर्भात होऊ घातलेली सभा विदर्भातील राजकीय क्षितिजावर प्रभाव पाडणारी ठरु शकते.
सभा स्थळांची चाचपणी करण्यासाठी व सभेची परवानगी घेण्यासाठी नागपूर येथील स्थानिक पदाधिकारी कामाला लागले आहेत.
२५ डिसेंबरला होणारी वंचित बहुजन आघाडीची पुर्व विदर्भस्तरीय सभा अभूतपूर्व व्हावी यासाठी विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड.प्रकाश आंबेडकर हे नागपूरच्या सभेत नेमके काय बोलणार याकडे अख्खा महाराष्ट्र राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
याचबरोबर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते,”हे, नागपूरच्या सभेकडे लोकसभा व विधानसभेची पुर्व तयारी या दृष्टिकोनातून बघत आहेत.