सावली (सुधाकर दुधे)

 

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याची खाण असल्याचे बोलले.त्यानंतर जिल्हात सोन,चांदी,तांबे,दुर्मिळ धातूची चर्चा सुरू झाली.या चर्चेला अद्यापही पूर्णविराम मिळाले नाही. अश्यात जिल्हातील एका गावात हिऱ्याची खाण असल्याचा संशोधनातून समोर आलं होत. या खाणीचा केंद्र चक्क एका घरातील चुलीच्या खाली आहे. या खाणीचे उत्खनन करण्यासाठी आता ग्रामपंचायत सरसावली आहे.हे गाव जिल्हातील सावली तालुक्यात येत.घोडेवाही असे नाव आहे.

भूगर्भ वैज्ञानिकांनी 1997-98 मध्ये सावली तालुक्यातील घोडेवाही व पाथरी येथे संशोधन केले.या संशोधनात हिऱ्यांचा साठा असल्याच सांगितल होत. घोडेवाई गावातील ज्ञानेश्वर तीवाडे यांच्या घरातील चूल केंद्रस्थान ठरली होती. सुमारे पाच कि.मी.च्या परिसरात हिऱ्यांचा साठा असल्याच संशोधकांनी ग्रामस्थाना सांगितलं होत. जवळपास दीड महिने संशोधकांनी गावात ठाण मांडलं होतं. गावाचा भूगर्भात हिऱ्याची खान असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली. जमिनीचे भावही वधारले होते. या संशोधनाला पंचवीस वर्षाच्या काल उलटला. मात्र हिरे बाहेर काढण्यासाठी कुठलीच हालचाल झालेले नाही.

 

आत्ता खोदाच…

 

घोडेवाही येथे झालेल्या संशोधनानंतर गावात उत्साह पसरला होता. खदान सुरू झाली असती तर अनेकांना रोजगार ,जमिनीला भाव मिळाला असता. मात्र खदान सुरू झाली नाही. यासंदर्भात घोडेवाहीचे उपसरपंच चेतन रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, खदान सुरू व्हावी यासाठी ग्रामपंचायत ठराव घेणार आहे. ही खदान आमच्या गावाचा विकासासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. त्यामुळे पूर्ण ताकदनिशी आम्ही प्रयत्न करू.

 

काय म्हणतात अभ्यासक…

 

गेल्या 15 व्या शतका पासून वैरागड ,गडचिरोली परिसरात हिरे आढळले होते.इंग्रजांनी पण इथे उत्खनन केले.पण मुबलक हिरे आढळले नाहीत.जी.एस.आय ने सुद्धा इथे सर्वेक्षण केले.परंतु प्रमाण अधिक नसल्याचे आढळले काही वर्षापूर्वी GSI च्या संशोधकांनी बस्तर क्रॅटन म्हणून संबोधले जाणाऱ्या सावली, गोंडपिंपरी,वैरागड ह्या भागात हिऱ्याचे अंश,कोग्लोमिरेट, निस ह्या खडकात आढळतात असा रिसर्च पेपर 2001 मध्ये प्रसिद्ध केला होता.परंतु व्यावसायिक दृष्ट्या किंवा खाणी होईल इतके साठे आपल्या भागात नसल्याच्या रिपोर्ट दिला होता.

 

सुरेश चोपणे,भूशास्त्र अभ्यासक

 

हिऱ्यासाठी झाले युद्ध..

 

विभाजन पूर्व चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड या परिसरात हिराच्या खाणी असल्याची नोंद इतिहासात सापडतात. त्यासाठी भयंकर युद्धही झाले आहेत. ब्रिटिश काळात सुद्धा हिरे काढण्याच्या प्रयत्न झाला होता. वैरागड परिसरात आजही त्याचा खानाखुणात दिसतात. यात परिसराला लागून सावली तालुका येतोय.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News