उमेश कांबळे ता प्र भद्रावती-
विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालय बॉक्सिंग मुले व मुली स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठांतर्गत असलेल्या एकूण 15 महाविद्यालयातील 45 पुरुष व महिला बॉक्सिंग खेळाडूंनी सहभाग दर्शविला या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे सर हे उपस्थित होते, यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे बॉक्सिंग क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक आणि भद्रावती तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाळे, विकास रामटेके उपस्थित होते. या स्पर्धेची तांत्रिक बाजू महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना आणि चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांनी सांभाळली. या स्पर्धेला पंच म्हणून वर्षा कोयचाळे, गायत्री बोस, लता तिवारी, विकास रामटेके पंच म्हणून योग्य निर्णय देत स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय भद्रावती शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागा तर्फे घेण्यात आल्या. या स्पर्धेची सर्व जबाबदारी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी सांभाळली. या स्पर्धेत विजयी खेळाडू अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेकरीता रोहतक येथे जाणार असून सर्व विजयी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.