डॉ. जगदिश वेन्नम

संपादक

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचे उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचे मागदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना गडचिरोली पोलीस दल व बिओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने कुक्कुटपालन व भाजीपाला लागवड प्रशिक्षण देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम दि. ११/११/२०२२ रोजी बिओआय आरसेटी कार्यालयात पार पडला.

 

सदर कुक्कुटपालन व भाजीपाला लागवड प्रशिक्षण हे दिनांक ०१/११/२०२२ ते ११/११/२०२२ पर्यंत १० दिवसांकरीता आयोजित करण्यात आले होते. कुक्कुटपालन प्रशिक्षणाकरीता २८ युवक-युवतीं व भाजीपाला लागवड प्रशिक्षणाकरीता २८ युवक-युवतींनी सहभाग घेवुन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सदर निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले व भाजीपाला लागवड प्रशिक्षण पुर्ण केलेल्या युवक-युवतींना स्प्रे पंपचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हयातील बेरोजगार युवक-युवतीं, शेतकरी व इतर जनतेनी गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकयांनी अत्याधुनिक शेतीचे ज्ञान घेऊन व दर्जेदार पद्धतींचा अवलंब करुन व त्याबाबतची सर्व माहीती संकलीत करुन आपला विकास करावा, यासाठी गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. तसेच नक्षलवाद्यांच्या खोटया चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने स्वतःचा व जिल्हयाचा विकास साधावा.

 

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सहलीचे आयोजन व तसेच बेरोजगार युवक-युवतींना व्युटीपार्लर १४०, मत्स्यपालन ८७, कुक्कुटपालन ५०४, बदक पालन १००, वराहपालन १०, शेळीपालन ८०, शिवणकला २२२, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड ५२५, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ८८०, टु व्हिलर दुरुस्ती ६४, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३०, टू / फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ३५५४ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

सदर निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. तसेच बीओआय स्टार आरसेटीचे संचालक, मा. श्री. चेतन वैद्य, श्री. मेश्राम, श्री. कुनघाडकर बीओआय स्टार आरसेटी गडचिरोली हे उपस्थित होते..

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे / उपपोस्टे / पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि. महादेव शेलार, पोउपनि, धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com