पालासावली येथे जनसेवा ग्रामसंघ मधील सामाजिक समस्या निवारण समिती द्वारे डेंगू आणि स्वच्छतेची राबविली मोहीम….

कमलसिंह यादव 

प्रतिनीधी 

पारशिवनी:- तालूक्यातील गट ग्रामपंचायत पालासावळी येथे गट विकास अधिकारी श्री सुभाष जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा ग्रामसंघ मधील सामाजिक समस्या निवारण समिती द्वारे डेंगू आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

        या मोहिम मध्ये गट ग्राम पंचायत पालासावली येथिल  ग्रामसंघ मधील महिला अध्यक्ष सौ. काजल राऊत तसेच सी.आर.पी.सौ.उषा,दुनेदार,एल.सी.आर.पी. सौ.सुषमा इंगळे तसेच गट ग्राम पंचायत पालासावळी चे सरपंच श्री. राजेन्द ठाकुर सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.डेंगु मोहीम रॅली मध्ये MSRLM चे श्री.पाटोळे सर यांनी रैली चे मार्गदर्शन केले.ग्रामसेवक श्री.बोबडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून ग्राम संघाच्या महिलांना डेंगू आणि स्वच्छता मोहीम बद्दल मार्गदर्शन केले.

       तसेच गट ग्राम पंचायत हदीतील पालासावली चे नव निर्वाचित पोलिस पाटील धमेन्द्र साधोराव दुनेदार, कालभैरव पेठ चे नवनिर्वाचित महिला रूपाली संदिप करकाडे, कोढासावली चे नवनिर्वाचित महिला पोलिस पाटिल पिंकी प्रविण मेश्राम असे पालासावली ग्रामपंचायत चे तिन्ही पोलिस पाटिल यांचा शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार ग्रामपंचायत पालासावली मार्फत सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांनी उपस्थित शाळेतील मुलांना व महिल ना डेंगु संबंधी माहिती दिली.