वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे

 

वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्रांतर्गत मालेगाव तालुक्यातील शिरसाळा गावामध्ये दि.१०/११/२०२२ रोजी शिरसाळा येथील युवकांनी पुढाकार घेऊन उद्बोधन कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं होतं.या उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव शिक्षा केंद्राच्या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.त्यामध्ये अनुभव शिक्षकेंद्राचे *धर्मनिरिक्षता, सामाजिक न्याय,स्त्री पुरुष समानता,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण* या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.अनुभव शिक्षा केंद्रा अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमाबाबत आणि अनुभव कट्ट्या बाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.गावामध्ये अनुभव कट्टा सुरू करण्यात आला.यामध्ये शिरसाळा गावातील युवकांनी पुढाकार घेऊन या उद्बोधन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.या उद्बोधन कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे उपस्थित होते.उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव साथी मा.प्रदीप पट्टेबहादूर गावातील नागरिक आणि युवकांचा मोठ्या प्रमाणे सहभाग होता.अशाप्रकारे उद्बोधन कार्यक्रम संपन्न झाला…

 

आशिष धोंगडे 

वाशिम प्रतिनिधी

दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News