अंजनगाव ठाणेदाराचा मनमानी कारभार,वरीष्ठाच्या आदेशाला केराची टोपली… — पोलिसांत दहशतीचे वातावरण,पोलीस अधीक्षकाकडे तक्रार… — अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक लक्ष देणार काय?

    युवराज डोंगरे

उपसंपादक / खल्लार..

     अंजनगाव सुर्जी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत निलंबीत पोलीस हवालदार संजय रायबोलें यांनी नियमानुसार रजेचा अर्ज देऊन एक दिवस विलंबनाने कर्तव्यावर हजर झाले.या कारणास्तव ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी आपल्याच कर्मचाऱ्यावर अन्याय केल्याचे कर्माच्याऱ्याचे म्हणणे आहे.

       याबाबत संबंधित हवालदाराने उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांच्याकडे रितसिरपणे विनंती केली.त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू करून घेण्याबाबत ठाणेदार प्रकाश अहिरे यांना अभिप्राय दिला.

     मात्र ठाणेदार अहिरे हे स्वतःला आयपीएस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी समजून,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून हवालदाराची चौकशी न करता,हवालदार यांना कर्तव्यावर हजर करून घेतले नाही व उलट पोलीस हवालदाराला जातिवाचक व अवराच्य भाषेत बोलून दमदाटी सुद्धा केली व हवालदाराचा गोपनीय अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला.

      त्यामुळे अंजनगाव पोलिसात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांची रक्षक म्हणून समाजात ओळख आहे.मात्र रक्षकावरच जर वरिष्ठ अधिकारी दबाव आणित असतील व त्यांना दमदाटी करीत असलतील तर पोलिसांचे मनोबल व मनोधैर्य खचेल आणि त्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होईल.त्यामुळे सर्वसामान्यांना पोलिसांकडून न्याय मिळणार काय? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे.

       तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते नियमित करण्यात येत नाही.पोलीस हवालदार संजय रायबोले हे एक जुलै ते 20 जुलै 2024 पर्यंत कर्तव्यावर हजर असूनही अंजनगाव ठाणेदार अहिरे यांच्या मनमानी कारभारामुळे वेतनापासून वंचित राहिले आहे.तसेच अनेक पोलीस शिपाई,कर्मचारी वेतनापासून तसेच निर्वाह भत्ता पासून वंचित आहेत.याला जबाबदार कोण आहे?हे मात्र न सुटणारे कोडे आहे.

       तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विभागीय चौकशी लिपिक व स्थानिक वेतन लिपिक यांच्यावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

        याबाबत पोलिस हवालदार संजय रायबोले यांनी झालेला अन्यायाबाबत पोलीस अधिकारी गाडगे नगर अमरावती यांच्याकडे तक्रार दिली व अमरावती ग्रामीण आस्थापना मध्ये अनुसूचित जातीचा कर्मचारी असल्याचे नमूद करून,पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन लिपिक व विभागीय चौकशी लिपिक आणि संबंधित ठाणेदार,अधिकारी यांचे विरुद्ध लेखी तक्रार दिली. 

     जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पदाचा गैरवापर करून अन्यायग्रस्त पोलीस हवालदाराला निलंबित केले,त्या निलंबना संबंधात सदर हवालदार यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती यांच्याकडे 25/07 2024 लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.

       त्यानुसार संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अद्याप पर्यंत कुठलीच कार्यवाही झालेली नाही.संबंधितांवर काय कारवाई होणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.