महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार:- माजी मंत्री तथा आमदार डॉ.नितीन राऊत.. — मागासवर्गीय बहूउद्धेशिय संस्था,तांदळे गुरुजी रिसोर्सेस and डेव्हलपमेंट सोसायटी,सृजन लोक विकास संस्था,व अँड.जितेंद्र वेळेकर यांच्या संयुक्त विद्यमाने,”महिला सक्षमीकरण,कार्यक्रम वैशाली नगर येथे संपन्न..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

            महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी महिलांचा आर्थिक स्तर अजून पर्यंत मजबूत झालेला नाही.देश व समाज हितासाठी महिलांचे सक्षमीकरण करणे आवश्यक असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार डॉ.नितीन राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले.

      मागासवर्गीय बहूउद्धेशिय संस्था अध्यक्ष आ.दर्शना गेडाम,तांदळे गुरुजी रिसोर्सेस आणि डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष आ.दिलीप तांदळे,सृजन लोक विकास संस्थेच्या अध्यक्षा आ.शालिनी हेडाऊ,अँड.जितेंद्र वेळेकर यांच्या द्वारा,महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन,” सम्यक संस्था,बोध्दीवृक्ष काॅलनी,वैशाली नगर नागपूर येथे संयुक्तपणे करण्यात आले होते.

           महिला सक्षमीकरणच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ.नितीन राऊत हे होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून लेबर अँन्ड सोशल जस्टिस सेंट्रल बोर्ड फाॅर वर्कर्स एज्युकेशन चिफ मुंबई चे विजीलेन्स अधिकारी प्रदीप मून हे आवर्जून होते.

        महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक म्हणून नागपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव अँड.नंदाताई पराते,नागपूर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ शहर उपाध्यक्ष बडोपंतजी टेंभुर्णे,नागपूर उच्चतम न्यायालय अधिवक्ता व जिल्हा बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अँड.उषा गुजर,मुंबईचे सि.एम.डी.आणि फिल्म डायरेक्टर विनोद खैरे,हे आवर्जून उपस्थित होते.

      तर विशेष अतिथी म्हणून दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके,उत्तर नागपूर ब्लॉक १४ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिपक खोब्रागडे,प्रादेशिक समन्वयक,एम.सी.ई.डी.संचालक आयकॉन स्किल डेव्हलपमेंटच्या डॉ.स्वाती वासनिक मॅडम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

              अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना आमदार डॉ.नितीन राऊत म्हणाले की,आजच्या स्थितीत महिला असुरक्षित असून त्यांच्या सुरक्षेकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करते आहे.महिला असुरक्षित असतील तर त्यांचे सक्षमीकरण कसेकाय होणार?असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी आपल्या मार्गदर्शनातंर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला.

            माजी मंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले की,सुरक्षित समाजासाठी महिलांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार अशी ग्वाही कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना त्यांनी दिली.

             प्रमुख मार्गदर्शकांसह दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके,डॉ.स्वाती वासनिक,विनोद खैरे यांनी उत्तम माहिती देत महिलांचे सक्षमीकरण कशात आहे या संबंधाने अनेक उदाहरणे दिली.

          महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला महिलांची भरगच्च उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे सुरेख व उत्तम सुत्रसंचलन सृजन लोक विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ.शालिनी हेडाऊ मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक तांदळे गुरुजी रिसोर्सेस अॅन्ड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष दिलीप तांदळे यांनी केले.

       उपस्थित सर्वांचे आभार मागासवर्गीय बहूउद्धेशिय संस्था अध्यक्ष दर्शना प्रमोद गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाच्या शिस्तबध्द आयोजनासाठी अँड.जितेंद्र वेळेकर यांनी आपले मोलाचे योगदान दिले.

 

         मागासवर्गीय बहूउद्धेशिय संस्था अध्यक्ष दर्शना प्रमोद गेडाम,सृजन लोक विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ.शालिनी हेडाऊ,तांदळे गुरुजी रिसोर्सेस अॅन्ड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष दिलीप तांदळे यांनी महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या आयोजनातंर्गत आवश्यक व पुरेशी व्यवस्था केली होती.