भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील रांगी केंद्रातील दुसरी शिक्षण परिषद प्रकाश अवसरे केंद्र प्रमुख रांगी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मिचगाव बुजरुक येथे दिनांक १०/१०/२०२४ ला पार पडली.या शिक्षण परिषदेत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करन्यात आले.
पंचायत समिती अंतर्गत शिक्षण परिषदेला उद्घाटक म्हणून अंजुम शेख उच्च श्रेणी मुख्याध्यापक रांगी,प्रमुख अतिथी म्हणून साधन व्यक्ती प्रेमिला दुगा मँडम पंस.धानोरा, धनराज वैद्य सर, शालिनी बोरकर, दिवाकर भोयर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
रांगी अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता 1 ते 8 ला शिकविणान्या शिक्षकांची व्दितीय शिक्षण परिषद जि.प.उ. प्रा. शाळा मिचगाव (बु.) येथे आयोजित करण्यात आली.
शिक्षण परिषदेत खालील विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
१) फुलोरा अध्ययनस्तर चाचणी विश्लेषण व कृती कार्यक्रम नियोजन, अंमलबजावणी.
2) FLN अध्ययनस्तर चाचणी विश्लेषण व चर्चा, कृती कार्यक्रम, नियोजन, अंमलबजावणी.
३) शिष्यवृत्ती मार्गदर्शन सत्र: 4) PAT पूर्वनियोजन व तयारी.
5) NAS-डिसेंबर-2024, पूर्व नियोजन व तयारी.
6) राज्यस्तरीय नवोपक्रम साधी-2024.
7) CWSN अध्ययनस्तर विश्लेषण न कृती कार्यक्रम नियोजन, अंमलबजावणी.
८) उल्लास. नवभारत साक्षरता कार्यक्रम, नोंदणी, टॅगींग व प्रत्यक्ष वर्ग.आदि विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
शैक्षणिक शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक योगेश वाढई मुख्याध्यापक मिचगाव (बु.) यांनी संचालन -विनायक पदा तर आभार प्रदर्शन – सचिन पोहनकर. यांनी मानले.