शिवरत्न जिवाजी महाले यांना म.ना.म. नाभिक युवा मंच व सलून व्यवसाय संघटना भंडारा च्या वतीने अभिवादन….

 

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          भंडारा- छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या 388 व्या जयंती निमित्त शास्त्री चौक, तुमसरे दूध डेअरी समोर, रेल्वेस्टेशन रोड, भंडारा शहरात दि.09/10/2023 ला सकाळी 11:00 वाजता अभिवादन करण्यात आले.

         प्रतापगडावर अफजल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून इतिहासामध्ये “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” या म्हणीने अजरामर झालेले शूरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांची 388 वी जयंती भंडारा शहरातील येथील “शास्त्री चौकात” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन नाभिक युवा मंच भंडारा व सलून व्यवसाय संघटना भंडारा च्या वतीने भंडारा तालुका अध्यक्ष सुधीर उरकुडे, भंडारा शहर अध्यक्ष अनंता वलुकार व सलून व्यवसाय संघटना भंडारा चे अध्यक्ष महेंद्र मानकर व सर्वश्री टिमने केले.    

      सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमत चे संपादक गोपाळकृष्ण मांडवकर सर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी विभागीय अध्यक्ष व मार्गदर्शक रोशन उरकुडे तसेच विभागीय युवक अध्यक्ष शरद उरकुडे हे होते.      

     कार्यक्रम नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा चे अध्यक्ष रवी लांजेवार, सचिव आदिनाथ सुर्यवंशी, सरचिटणीस राजू सुर्यवंशी, राजकुमार लांजेवार, चंद्रप्रकाश लांजेवार, लव्हाजी फुलबांधे सर, हरिभाऊ रुद्रकार व समाजबांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

            सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत सेनाजी महाराज, संत नगाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शिवरत्न जिवाजी महाल्ले व आई जिजाई च्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून शिवरत्न जिवाजी महाल्ले यांच्या शिवशौर्यास अभिवादन करण्यात आले व “जय जिवाजी जय शिवाजी” असे नारे सर्व समाजबांधव व युवकांनी लावत परिसर दुमदमून टाकला. 

     यावेळी प्रमुख पाहुणे यांनी शिवरत्न जिवाजी महाल्ले यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना सांगितले की शिवकालीन इतिहासात प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान भेटी दरम्यान जेव्हा

खानाने शिवरायांवर कट्यारीने पाठीवर अनेक वार केले पण आधीच चाहूल असल्यामुळे बचाव म्हणून घातलेल्या चिलखतामुळे वार फिसलत गेला व शिवरायांनी लगेच वाघनखाने खानाच्या आतड्या फाडल्या व ठार केले, त्याच वेळी शिवाजींवर खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा जीवघेणा वार करणार त्याच वेळी जिवाजी महाल्ले यांनी क्षणाचाही विलंब न लावता उंच उडी घेत तो वार पेलवून वरच्या वर दांडपट्ट्याने संय्यद बंडाचा हातच कापून त्याचा मुर्दा पाडला व स्वराज्याचे रक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविता अचूक अंगरक्षकाची भूमिका पार पाडली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, *”होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी..!”* ज्या म्हणीची आजही इतिहासात नोंद आहे. 

     युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन मावाल्यांची सेनेचे स्वराज्यावरील प्रेम व मराठीभूमी च्या अस्मितेसाठी त्याग व बलिदान यांवर चिंतन मनन करावे व संघटीत राहून समाजसेवेतून देशसेवा साध्य करता येईल व नाभिकांचे गौरव वाढवावे असे आव्हाहन केले. 

     सदर कार्यक्रमाच्या सफलतेसाठी सर्वश्री नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा चे भंडारा तालुका सचिव अजय इलुरकर, सुरेश सुर्यवंशी, निमिष अंबुलकर, संतोष लांजेवार, श्याम मानकर, गोपाळ कुकडकर, दिपक फुलबांधे, ईश्वर उरकुडे, धरम राजूरकर, हरी लक्षणे, सुरज नागमोते, प्रशांत अतकरे व अनेक युवक कार्यकर्ते व सलून व्यावसायिक समाजबांधवांनी सहकार्य केले. 

     कार्यक्रम साउंडस्पिकरावरील पोवाड्याच्या सुरात गाजत होता, येणारे जाणारे आनंद घेत होते व कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.