अरमान बारसागडे
तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर – तालुक्यात सद्ध्या सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना मजूर मिळेनासे झाले आहे , त्यामुळे शेतकऱ्यांना मजूरांची बाहेर गावून ने – आण करावी लागत आहे.
शिरपूर – नेरी मार्गाने सोयाबीन कपनिसाठी मजूर घेऊन जात असताना टाटा सुमो वाहनाचे टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. यात दोन मजूर गंभीर जखमी तर ७ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टाटा सुमो वाहन क्रमांक एमएच ४४ / बी १०१७ ने १० ते १२ मजूर सोयाबीन कपणीसाठी शिरपूर मार्गे नेरीला नेत असताना मार्गावरील संजय डोंगरे यांच्या सेताजवळ वाहनाचा टायर फुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाले यात दोन मजूर गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व तत्काळ वाहनाची व्यवस्था करून जखमींना उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास चिमूर पोलिस करत आहेत.