स्व.गीताताई कापगते स्मृती प्रतिष्ठान तर्फे नाट्य कलावंतांचा सत्कार…

 

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

 

साकोली:स्वर्गीय गीता ताई कापगते यांच्या स्मृती प्रित्यर्थ,राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ साकोली द्वारा आयोजित झाडीपट्टीतील निवडक संपूर्ण महिला कलावंतांनी साकारलेली संगीतमय तीन अंकी नाटक “सोन्याची द्वारका” मागील वर्षी शेंदूरवाफा /साकोली येथे भव्य रंगमंचावर अफाट जनसागराच्या गर्दीने मोठ्या थाटात पार पडले.

  स्वर्गीय गीताताई कापगते यांचे व्यक्तिमत्व म्हणजे नाट्यकला, गायनकला, वक्तृत्वकला, राजकारण व समाजकारण या सर्वांचे संगम होय. गीता ताई चे सासर भंडारा जिल्ह्यातील साकोली तर माहेर गडचिरोली जिल्ह्यातील होय. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गीताताई त्यांच्या अंगीभूत विविध कलांमुळे सुपरिचित होत्या. अवगत असलेल्या विविध कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तळागाळातील सर्व जाती ,धर्मातील महिलांना सोबत घेऊन नाटक, भजन, सांस्कृतिकक्षेत्र, समाजकारण ,राजकारण इत्यादी मध्ये समरस करून घेतले. केवळ गृहिणी म्हणून वावरणाऱ्या अनेक महिलांना त्यांनी सोबत घेऊन नाटकाच्या रंगमंचावर उभे केले.

         भजन व गायन मध्ये पुढे नेले त्यांच्या कलेच्या हा वारसा पुढेही जोपासला जावा या हेतूने त्यांच्या मोठ्या भगिनी सौ. वैजयंताताई कापगते यांनी गीताताई च्या सहवासातील सौ रजनी डोंगरवार, सौ तेजस्विनी डोंगरवार, सौ उर्मिला निंबेकर, सौ जिजा हातझाडे ,सौ संगीता खुणे, सौ मंजुषा कापगते, सौ अलका लांजेवार, सौ संगीता पुस्तोडे, सौ सुशीला कापगते ,सौ दुर्गा हटवादे, सौ ज्योती बुद्धे, सौ रेखा कापगते, सौ भारती हातझाडे, सौ पूजा पोगळे, सौ प्रीती तुमसरे, सौ आशा कापगते ,सौ मोनिका काशीवार, सौ कल्पना कापगते, सौ भाग्यश्री कापगते, सौ गीताताई बोरकर, सौ मीनाताई बोरकर, सौ गीताताई हातझाडे ,सौ कुंदाताई कापगते इत्यादी या महिला कलावंतांना सोबत घेऊन स्वर्गीय गीताताईच्या स्मृतीप्रित्यर्थ “सोन्याची द्वारका ” या नाट्यप्रयोगाचे यशस्वीरित्या आयोजन केले. या कलावंतांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने गीता ताईच्या तृतीय पुण्यस्मरणाचे औचित्य साधून सर्व महिला नाट्य कलावंत व सहयोगी यांना गीता ताई स्मृती प्रतिष्ठान तर्फे स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

        या नाट्यप्रयोगासाठी शरद (सदुभाऊ) कापगते,ललितजी खुणे, कैलासजी लोथे, चैतरामजी झोडे, उद्धवजी कटकवार, मोरेश्वरजी कापगते, छगनजी पुस्तोडे, टिकारामजी सोनवाणे, लक्ष्मीकांतजी कापगते, सेवकरामजी पुस्तोडे इत्यादींनी आता परिश्रम घेऊन नाट्यप्रयोग यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले.