सरकारी शाळेत लागले हाऊस फुल्ल चे बोर्ड… — प्रवेशोत्सव उत्साहात साजरा, पहिल्याच दिवशी 100% प्रवेश… — मुख्यमंत्र्यांचा हस्ते होणार निवासी शाळेचे उद्घाटन..

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली दि. 01 : समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा जिल्ह्यात 2 असून विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता तिसरी निवासी शाळा गडचिरोली येथे बांधण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते दिनांक 8 जुलै रोजी होणार आहे.

      विदर्भातील शाळा 30 जुन पासून सुरू करण्यात आल्या. नेहमीच खासगी शाळांमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरे करण्यात येतात मात्र त्यामानाने सरकारी शाळेत तसे वातावरण दिसून येत नाही. मात्र समाज कल्याण विभागच्या निवासी शाळेत मात्र उलट चित्र पाहण्यात आले. वांगेपल्ली तालुका अहेरी येथील निवासी शाळेत उत्साहात प्रवेशाचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.

        महाराष्ट्राच्या तेलंगणाच्या सीमेवर ,अती दुर्गम अशा तालुक्यातील शाळेत मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. तसेच निवासी शाळेतील सर्व 200 प्रवेश पहिल्याच दिवशी फुल झाले. त्यामुळे हाऊस फुल्ल चे बोर्ड लावावे लागले. जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे 2 निवासी शाळा आहे .एक मुलांची वांगेपल्ली येथे तर दुसरी मुलींची सिरोंचा येथे .या शाळेत सर्व सोयीसुविधा असून राहणे,जेवण, पुस्तके सर्व गोष्टी मोफत पुरविल्या जातात. दुर्गम भाग असूनही सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच गुणवत्ता वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न समाज कल्याण विभाग करणार असल्याचे डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त ,श्री. गणेश दुधे मुख्याध्यापक यांनी सांगितले.