ऋषी सहारे
संपादक
आरमोरी : तालुक्यातील वाघने शिकार करण्याचं प्रमाण वाढत असून ही जनता सकाळी घरा बाहेर पडले अन अनर्थ घडला. बकऱ्यांसाठी चारा आणण्यास आपल्या सहकाऱ्यांसोबत जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाने बळी घेतल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास कक्ष क्रमांक ६७ मध्ये घडली. पुरुषोत्तम वासुदेव सावसागडे (५५ वर्ष) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. गेल्या पाच दिवसात आरमोरी तालुक्यात वाघाने तिसरी शिकार केली आहे.
तालुक्यातील रवि येथील पुरुषोत्तम वासुदेव सावसागडे हे आपल्या घरी पाळलेल्या बकऱ्यांना चारा आणण्यासाठी आपल्या ९ ते १० सहकाऱ्यासोबत रवि गावापासन दोन ते तीन कि. मी. अंतरावरील मुलुर येथील
कक्ष क्रमांक ६७ मध्ये गेले होते. त्या ठिकाणी वाघाच्या येण्याजान्याचा नेहमीचा मार्ग आहे.
शिवाय वनविभागाच्या वतीने जंगलात वाघ, / अस्वल व इतर हिंस्त्र प्राणी असल्याने कुणीही जंगलात जाऊ नये, असा फलकही लावलेला आहे. परंतु जे घडावे तेच घडले अन् कुटुंबावर संकट ओढवले.