वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे
वाशिम:- कारंजा लाड तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला अनिकेत ढवक याने नेट परीक्षा उत्तीर्ण केली.17 जुलै 2022 मध्ये झालेल्या नेट परीक्षेमध्ये अनिकेत गजाननराव ढवक याने 611 गुणाने नेट परीक्षा उत्तीर्ण झाला.वडील शेतकरी असून मुलाच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचे ताणतणाव न येता मुलाला शिक्षण शिकावे या दृष्टिकोनतून आई-वडिलांनी अनिकेतला चांगल्या प्रकारे शिकवले त्याच शिक्षणाचा फळ अनिकेतने नेट परीक्षा उत्तीर्ण करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटाकडे निघाला त्यामध्ये कामरगाव सर्कल मधून अनिकेतचे कौतुक आणि गौरव होत आहे. तसेच लातूर येथे दि.९/१०/ २०२२ रोजी अनिकेतचा पारितोषिक आणि गौरव करण्यात आला.संपूर्ण लाडेगाव मधून अनिकेत चे कौतुक होताना दिसून येत आहे.लाडेगावच्या इतिहासामध्ये आणखी एक नोंद अनिकेतने केली आहे.
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्यूज भारत