आळंदी : शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातांना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते.या विद्यार्थिनींना किशोर वयाबाबतचे शास्त्रीय ज्ञान व आरोग्य विषयक माहिती असणे आवश्यक आहे. शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन डॉ.ज्योत्स्ना आवारी यांनी केले.

श्री.ज्ञानसाई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने डॉ. ज्योत्स्ना आवारी यांचे शालेय विद्यार्थींसाठी आरोग्य मार्गदर्शन व समुपदेशन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या प्रमुख अंजली उपाध्ये,अध्यक्ष कविता उपाध्ये,मुख्याध्यापिका उर्मिला जाधव,मोहिनी भदाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समज-गैरसमज, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, योग्य आहार, आरोग्याशी निगडित समस्या यावर डाॅ.ज्योत्स्ना आवारी यांनी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमांमुळे अज्ञानाचा पडदा दूर होऊन मुली सबळ होतील,असे प्रतिपादन संस्थेच्या प्रमुख अंजली उपाध्ये यांनी केले.

शालेय विद्यार्थींनी आणि महिला आरोग्य मार्गदर्शन व समुपदेशन व्याख्यानमालेसाठी ५०० हून अधिक विद्यार्थींनी आणि महिलांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम आणि सीमा वायदंडे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com